Harsharan Singh Sarkarnama
देश

Delhi Politics: दिल्लीत निवडणुकीआधीच आम आदमी पार्टीला भाजपकडून मोठा धक्का!

Harsharan Singh Balli entry into BJP: माजीमंत्री हरशरण सिंह बल्ली यांनी मुलासह भाजपमध्ये केला प्रवेश

Mayur Ratnaparkhe

Delhi News: दिल्लीत विधानसभा निवडणुकीआधी आम आदमी पार्टीला मोठा झटका बसला आहे. ज्येष्ठे नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्री राहिलेले सरदार हरशरण सिंह बल्ली यांनी आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी दिली आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी त्यांचा पक्षात प्रवेश करून घेतला. त्यांचा मुलगा सरदार गुरमीत सिंह रिंकू बल्ली यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हरशरण सिंह बल्ली यांनी रविवारी दिल्ली भाजपचे (BJP) अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि त्याचं जुने सहकारी सुभाष आर्य व सुभाष सचदेवा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे पुत्र गुरमीत सिंह रिंकू आम आदमी पार्टीचा तरूण चेहरा होता. मात्र त्यांनीही वडिलांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे.

सरदार हरशरण सिंह बल्ली दिल्लीतील हरिनगर मतदारसंघातून चारवेळा आमदार झालेले आहेत. ते पहिल्यांदा 1993मध्ये आमदार झाले, त्यानंतर 2013मध्ये शेवटच्यावेळी आमदार झाले होते. याशिवाय ते मदनलाल खुराना सरकारमध्ये मंत्री देखील होते. त्यांनी उद्योग, कामगार, तुरुंग, भाषा, गुरुद्वारा प्रशासन अशा अनेक विभागांची जबाबदारी सांभाळलेली आहे.

जेव्हा 2013मध्ये बल्ली यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नव्हती, तेव्हा त्यांनी काँग्रेस (Congress)मध्ये प्रवेश केला होता आणि निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. मग पुन्हा 2020मध्ये त्यांनी पक्ष बदल करत अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता आणि आता ते पुन्हा एकदा भाजपमध्ये आले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT