Arvind Kejariwal
Arvind Kejariwal Sarkarnama
देश

Karnataka Election Result 2023 : जालंधर लोकसभेची पोटनिवडणूक जिंकणाऱ्या 'आप'ची कर्नाटकात हवा फूस्स !

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Assembly Election Result : कर्नाटक विधानसभेच्या एकूण २२४ जागासांठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस २२३, भाजप सर्व २२४ तर जेडीएसने २०९ जागांवर उमेदवार दिले. या तिरंगी निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. दरम्यान, राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या आम आदमी पक्षानेही २०९ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र कर्टनाकमधील जनेतेने 'आप'ला पूर्णपणे नाकारल्याचे दिसून आहे. त्यामुळे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची घोर निराशा झाली आहे. (Karnataka Assembly Election Result)

'आप'ने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतील २०९ जागांवर उतरण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशनानंतर 'आप'ला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळाला. त्यामुळे या निवडणुकीत 'आप'ला फायदा होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. दरम्यान, २०१८ नंतर २०२३ मध्ये कर्नाटाकमध्ये निवडणूक लढविणाऱ्या 'आप'ला एक टक्काही मते घेता आलेली नाहीत. (Arvind Kejariwal)

सध्या काँग्रेसने १३६ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप ६४ जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसला २२ जागा मिळतील, असे चित्र आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कर्नाटकातील जनतेने आम आदमी पक्षाला पूर्णपणे नाकारल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरून दिसून येत आहे. या निवडणुकीत आपला फक्त ०.५७ टक्के मते मिळालेली. तर या निवडणुकीत 'आप'च्या अनेक उमेदवारांना हजार मतेही मिळालेली नाहीत.

आम आदमी पक्षाने कर्नाटकमध्ये २०९ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यांना एकूण ४५ हजार २०१ मते मिळालेली. पंजाब विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पक्षाचा सतत विस्तार होत आहे. राष्ट्रीय स्तरावर मुख्य विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेण्याचा आपचा प्रयत्न होता. २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपने २८ जागांवर आपले उमेदवार उभे केले. त्यावेळी 'आप'ला केवळ ०.०६ टक्के मते मिळाली होती. (AAP in Karnataka)

या निवडणुकीत आम आदमी पक्षाने कर्नाटकातील २०९ विधानसभा जागांसाठी आपले उमेदवार उभे केले. दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेस-भाजप-जेडीएस अशी तिरंगी लढत होईल अशी शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तविली होती. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसने बाजी मारली आहे. भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जेडीएस तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र आम आदमी पक्ष खाते उघडण्यात अपयशी ठरला आहे. कर्नाटकच्या जनतेने 'आप'ला पूर्णपणे नाकारले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT