Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाची ही आहेत प्रमुख कारणं..

Karnataka Assembly Election Result 2023 : आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे.
DK Shivakumar Congress News
DK Shivakumar Congress NewsSarkarnama

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळत आहे. १३७ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

भाजप 63 जागांवर आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर जेडीएस 20 जागांवर पुढे आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे. काँग्रेसच्या विजयाचे कारणे काय आहेत, हे जाणून घेऊयात

DK Shivakumar Congress News
Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात भाजपच्या पराभवाची ही आहेत प्रमुख कारणं ..
  • स्थानिक नेते डी.के शिवकुमार, सिद्धरामय्या, मलिक्कार्जून खर्गे यांच्यासह गांधी परिवार थेट निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते.

  • खर्गेंनी मोदींना विषारी सापाची उपमा दिली. खर्गेंची भाजपने कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ही कोंडी फोडून काढली.

  • राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा कर्नाटकात काँग्रेसला फायदा झाला. ही यात्रा अधिक काळ कर्नाटकात होती.

DK Shivakumar Congress News
Karnataka Election Result 2023 : बेळगाव दक्षिणमध्ये कमळ फुललं ; अभय पाटील विजयी ; एकीकरण समितीचे कोंडूसकर पराभूत
  • डी.के शिवकुमार, सिद्धरामय्या या दोन नेत्यांचा योग्य वापर प्रचारात केला.

  • डी.के शिवकुमार, सिद्धरामय्या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडविण्यात काँग्रेसला यश

  • महिला आणि युवकासाठी काँग्रेसचे पाच आश्वासने

  • बजरंग दलावर बंदी घालण्याची केलेली घोषणा मागे न घेतल्यानं मुस्लिम मतदारांना पाठिंबा मिळाला.

  • डीके शिवकुमार यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. त्याचा फायदा झाला.

  • कर्नाटकचे आपणच खरे सिकंदर आहोत, हे मलिक्कार्जून खर्गेंनी दाखवून दिले.

  • काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून खर्गेंना मोठा फायदा

आता कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार हे दोघेही आहेत. या दोघांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलवले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची काँग्रेसची परंपरा आहे, पण पहिल्यांदाच काँग्रेसने कर्नाटकात ही परंपरा मोडली. दोन्ही नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरुन निवडणुकीपूर्वीच संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेसने ही भूमिका घेतली होती. "काँग्रेसची सत्ता आली तर नेते ठरवतील की मुख्यमंत्री कोण होणार,' असे मलिक्कार्जून खर्गे यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com