Eknath Shinde, Arvind Kejriwal Sarkarnama
देश

AAP crisis : दिल्लीतील पराभवानंतर आपचा 'तो' नेता एकनाथ शिंदेंच्या मार्गाने जाऊ शकतो; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

AAP leader Delhi defeat News : दिल्लीच्या पराभवाचे पडसाद येत्या काळात पंजाबमध्ये उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणच्या घटना घडामोडीकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्युरो

New delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला दिल्लीतील सत्ता सोडावी लागली आहे. त्या पराभवाचे पडसाद येत्या काळात सर्वत्र उमटण्याची शक्यता आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाला 70 पैकी केवळ 22 जागा मिळाल्या. तर भाजपने 8 वरुन 48 वर झेप घेत दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. या पराभवाच्या धक्कयातून आप सावरणार का ? याकडे लक्ष लागले असतानाच आता पंजाब काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी मोठा दावा केला आहे.

दिल्लीच्या पराभवाचे पडसाद येत्या काळात पंजाबमध्ये उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणच्या घटना घडामोडीकडे लक्ष लागले आहे. 'पंजाबमधील आपचे त्यांच्या दिल्लीतील नेतृत्त्वाशी आधीपासूनच मतभेद आहेत. पंजाब आप (AAP) आणि दिल्ली आप यांच्यामध्ये संघर्ष आहे. भगवंत मान गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. जेव्हा महाराष्ट्राचे हे विमान चंदिगढमध्ये उतरेल तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकणारे भगवंत मान असतील,' असा दावा बाजवा यांनी केला.

30 आमदार काँग्रेसच्या संपर्कात

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान लवकरच एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मार्गाने जाऊ शकतात, असा सनसनाटी दावा बाजवा यांनी केला आहे. आपचे 30 पेक्षा अधिक आमदार काँग्रेसच्या संपर्कात असून ते कधीही पक्षांतर करु शकतात, असे बाजवा म्हणाले.

आपचे आमदार बऱ्याच कालावधीपासून संपर्कात आहेत. मी पंजाब काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाच्या 22 नेत्यांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तिकीट नाकारले होते. त्यामुळे त्या नेत्यांनी आपची वाट धरली आणि तिकीट मिळवले आहे. आता आपची सत्ता येणार नाही, याची जाणीव त्यांना झालेली आहे, असे बाजवा यांनी स्पष्ट केले .

केजरीवाल पंजाबमध्ये येण्याची शक्यता

पंजाब आपचे अध्यक्ष अमन अरोरा यांच्याकडून सध्या होत असलेली विधाने त्यांच्यात असलेल्या मतभेदांमुळे केली जात आहेत. पंजाबमध्ये शीख मुख्यमंत्रीच असावा असे काही गरजेचे नाही, असे अरोरा म्हणाले होते. त्यामुळे येत्या काळात केजरीवाल पंजाबमध्ये येतील, तशी तयारी सुरु केली आहे. ते आधीपासूनच केजरीवालांना पंजाबमध्ये उतरवण्याच्या प्रयत्नात होते, असा दावा बाजवांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT