MP Sanjay Singh  Sarkarnama
देश

Sanjay Singh : २३ वर्षे जुन्या खटल्यात 'AAP' खासदार संजय सिंह यांच्या अटकेचे आदेश!

AAP MP Sanjay Singh News : समाजवादी पार्टीचे प्रवक्ते आणि माजी आमदाराचाही आहे आदेश; न्यायालयाने पोलिसांना २८ ऑगस्टला हजर करण्याचे दिले आहेत आदेश.

Mayur Ratnaparkhe

AAP MP Sanjay Singh Arrest order : उत्तर प्रदेशातील सुल्तानपुरच्या न्यायालयाने तब्बल २३ वर्षे जुन्या एका खटल्यात आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह, समाजवादी पार्टीचे प्रवक्ते आणि माजी आमदार अनूप संडा यांच्यासह सहा जणांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. सुल्तानपुरच्या MP-MLA कोर्टाने पोलिसांना या सर्वांना 28 ऑगस्ट पर्यंत हजर करण्यास सांगितले आहे.

हे प्रकरण १९ जून २००१ रोजीचं आहे. नगर कोतवाली परिसरातील लखनऊ नाका जवळ आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह(Sanjay Singh), समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्त आणि माजी आमदार अनूप संडा यांच्यासह काहीजण वीज, पाणी आणि अन्य नागरी समस्यांवरून आंदोलन करत होते. या सर्वांनी उड्डाण पूलाजवळ आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात विविध कलामांतर्गत त्यांच्याविरोधात खटला दाखले केला गेला होता.

आता MP-MLA कोर्टाने याप्रकरणी सुनावणी करत, या सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे आणि सर्वांना तीन-तीन महिन्यांच्या कारावास आणि दीड हजार रुपयांचा दंड ठोठवला होता. सर्वांनी शिक्षेतून सुटण्यासाठी सत्र न्यायालयाचा आधार घेतला होता.

परंतु तिथेही त्यांना कोणताही दिलासा मिळाला नव्हता. 9 ऑगस्ट रोजी या सर्वांना कनिष्ठ न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले गेले, परंतु मात्र त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतील होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT