BJP News : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र; राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून रावसाहेब दानवे नाही, तर 'या' नेत्याला संधी

Rajya Sabha Candidates of BJP : भाजपने राज्यसभा पोट निवडणुकीसाठी आसाम, बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडीसा, राजस्थान आणि त्रिपुरा या आठ राज्यातील 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
List of Rajya Sabha Candidates of BJP
List of Rajya Sabha Candidates of BJPSarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha by Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यसभेच्या 12 जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी उमेदारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे.

अशातच आता भाजपने (BJP) राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी आसाम, बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडीसा, राजस्थान आणि त्रिपुरा या आठ राज्यातील 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये आसाममधून दोन उमेदवार तर उर्वरीत राज्यातून प्रत्येकी एक उमेदवार देण्यात आला आहे.

राज्य आणि उमेदवाराचे नाव

आसाम - मिशन रंजन दास आणि रामेश्वर तेली

बिहार - मनन कुमार मिश्र

हरियाणा - किरण चौधरी

मध्य प्रदेश - जॉर्ज कुरियन

महाराष्ट्र - धैर्यशील पाटील

ओडिशा - ममता मोहंता

राजस्थान - सरदार रवनीत सिंह बिट्टू

त्रिपुरा - राजीव भट्टाचार्य

9 राज्यातील 12 रिक्त जागांसाठी ही पोट निवडणूक होणार आहे. या रिक्त जागांमध्ये महाराष्ट्रातील 2 जागांचा समावेश आहे. यापैकी आता धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे उर्वरित एका जागेवर कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं आहे.

List of Rajya Sabha Candidates of BJP
Modi Government : मोदी सरकारची माघार; राहुल गांधींसह केंद्रीय मंत्र्यांच्याच विरोधानंतर घेतला मोठा निर्णय

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरत या जागेवर पाटील यांना संधी दिली आहे.

List of Rajya Sabha Candidates of BJP
(Video) Badlapur School Case : धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेतील वामन म्हात्रेची मुजोरी; 'सकाळ'च्या महिला पत्रकाराला शिवीगाळ अन् धमकीही

राष्ट्रवादी शिवसेनेला संधी मिळणार?

लोकसभेत निवडून गेलेले राज्यसभेतील दोन्ही खासदार भाजपचे (BJP) होते. त्यामुळे महायुतीतून या दोन्ही जागा भाजपच लढवेल यात शंका नाही. मात्र, युतीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वाट्याला उर्वरित एक जागा जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com