CJP Protest News: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा लढ्याचे संकेत दिले आहेत. जामीन मंजूर झाल्यानंतर मुंबईकडे रवाना होण्याआधी त्यांनी आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आशुतोष रांका आणि सौरव दास तुरुंगातून बाहेर आल्यांतर पुढील रणनीती ठरविली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विमानतळावर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिपके म्हणाले "गेल्या काही दिवसात लोकांना बेकायदेशीर अटक आणि नजरकैद यांची भीती दाखवून दडपण्याचा प्रयत्न केला जातो आहे,आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही याला घाबरणार नाही ना माघार घेणार आम्ही लढत राहू आमचा हा लढा दीर्घकाळ चालूच राहील. यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत".
१४ ऑक्टोबर रोजी सीजेपीच्या आंदोलकांनी जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्याने आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. दोघांची पाच दिवसांची कोठडी संपल्यानंतर पुढे दोघे यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष राहणार आहे.
सौरव दास आणि आशुतोष रांका याच्याविषयी बोलताना दिपके म्हणाले "आशा आहे की आजच दोघांनाही तुरुंगातून सोडले जाईल. काही कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी मी वृंदा मॅडमना भेटायला जात आहे. पुढील रणनीतीबद्दल बोलताना दिपके म्हणाले “एकदा सौरव आणि आशु बाहेर आले की आम्ही एकत्र येऊन नवीन रणनीती चर्चा करु त्यानंतर पुढे कसे जायचे ते ठरवू"
शुक्रवारी दिल्लीतील कनॉट प्लेस येथे सीजेपीच्या ‘तिरंगा मार्च’काढण्यात येणार होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दोन दिवस हे ठिकाण बंद करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी दिपके यांना नोटीस देऊन मार्च काढण्यास मनाई केली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांकडून अभिजीत दीपके यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलमांनुसार अटक करण्यात आली होती. शनिवारी(ता.१८) पुढील एक वर्ष शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.