Ravindra Dhangekar: भाजप नेत्यांचे रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्री आता पोलिसांकडून बनवून घेणार? शिंदेंच्या पक्षातील बड्या नेत्याचा खळबळजनक दावा!

Devendra Fadnavis News: पुण्यातील भाजपच्या बैठकीत नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यासाठी पोलिसांचा वापर होणार असल्याचा दावा शिवसेनेचे रविंद्र धंगेकर यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
Devendra Fadnavis, Ravindra Dhangekar
Devendra Fadnavis, Ravindra DhangekarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Politics News :  विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (14 ऑक्टोबर) पुण्यात भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीत भविष्यात नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापन होणार असल्याची चर्चा होती. यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

भाजपच्या नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यासाठी आता पोलीस यंत्रणेचा वापर केला जाणार असल्याचा खळबळजनक दावा रवींद्र धंगेकर यांनी केला. दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्याच लोकप्रतिनिधींचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यासाठी पोलिसांचा वापर करण्याचा इशारा दिल्याचे धंगेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या बैठकीतील चर्चेला आता नवा राजकीय रंग चढला आहे.

‘उद्या पद मागायला आलात, तर आधी रिपोर्ट कार्ड पाहणार,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी भाजप नगरसेवकांना कामाचा हिशेब मागितल्याची चर्चा होती. मात्र, या रिपोर्ट कार्डसाठी थेट पोलीस यंत्रणेचाच वापर होणार असल्याचा दावा रविंद्र धंगेकर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपच्या बैठकीतील ‘रिपोर्ट कार्ड’चा नवा खुलासा

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पुण्यात भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली होती. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतानाच नगरसेवकांच्या कामकाजाचा हिशेब मागितल्याचे सांगण्यात आले होते. भविष्यात पक्षातील पदे आणि जबाबदाऱ्या मागताना केलेल्या कामाचे मूल्यमापन केले जाईल, असा संदेशही या बैठकीतून दिल्याची चर्चा होती.

Devendra Fadnavis, Ravindra Dhangekar
Water Conservation: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! ३८ संस्थांना २० टक्के कपातीचा दणका; आदेश धुडकावल्यास कारवाई

याबाबत त्यांनी सोशल मीडिया वर आपली भूमिका मांडली आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले, पुण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या बैठकीत गृहमंत्री महोदयांनी स्वतःच्याच लोकप्रतिनिधींचे 'रिपोर्ट कार्ड' तयार करण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करण्याचा इशारा दिला, हे अत्यंत चिंताजनक आहे. पोलिसांचा वापर पक्षीय कामांसाठी किंवा नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी न करता पुण्याची बिघडलेली कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी आणि समाजहितासाठी करावा असा विनंतीवजा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Devendra Fadnavis, Ravindra Dhangekar
Devendra Fadnavis Statement : पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट: शिवसेनेच्या भूमिकेबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान; 'एकनाथ शिंदेंनी समज द्यावी'

‘नेत्यांची कुकर्मे मीच सांगतो’

बैठकीबाबत धंगेकर यांनी वेगळाच दावा केला आहे. लोकप्रतिनिधींचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करण्याचा इशारा दिल्याचे सांगत त्यांनी फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माझी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे,आपल्या नेत्यांची कुकर्मे आणि रिपोर्ट कार्ड हवे असल्यास मी स्वतः आपल्याला देण्यास तयार आहे, त्यासाठी शासकीय यंत्रणेचा अपव्यय कशासाठी? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com