CJP Abhijeet Dipke news Sarkarnama
देश

Cockroach Janata Party news : अभिजीत दीपके यांनी PM मोदींच्या विश्वासू मंत्र्यांना घेतलं शिंगावर, पुराव्यानिशी दिलं प्रत्युत्तर; क्रॉक्रोच जनता पार्टीला भारतातूनच 'सपोर्ट'

Abhijeet Dipke news, Kiren Rijiju statement : अभिजीत दीपके यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनुसार कॉक्रोच जनता पार्टीचे तब्बल ९४.७ टक्के फॉलोअर्स हे भारतीय असून १ टक्के फॉलोअर्स अमेरिकन आहेत.

Rajanand More

CJP latest news : मागील आठवडाभरापासून देशात क्रॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) लोकप्रियतेने कळस गाठला आहे. सोशल मीडियात या पार्टीच्या फॉलोअर्सचा आकडा दोन कोटींच्या पुढे गेला आहे. त्यावरून आता देशाचे राजकारणही तापू लागले आहे. CJP चे सर्वाधिक फॉलोअर्स पाकिस्तानी असल्याचा दावा करणारे काही आकडे सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही सोशल मीडियात एक पोस्ट करत क्रॉक्रोच जनता पार्टीचा उल्लेख न करता निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर पाकिस्तान आणि 'जॉर्ज सोरोस टोळी'कडून फॉलोअर्स मिळविणाऱ्या लोकांची मला कीव येते, असे विधान रिजिजू यांनी केले आहे. तसेच भारताकडे अत्यंत उत्साही युवा वर्ग आहे, जे खरोखरच प्रामाणिक आणि मौल्यवान फॉलोअर्स ठरू शकतात, असे रिजिजू म्हणाले आहेत.

सोशल मीडियात सीजेपीच्या फॉलोअर्सवरून सुरू असलेल्या वादानंतर अखेर पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी त्यावर स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी सीजेपीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचे स्क्रीन रेकॉर्डिंग शेअर करत ९४ टक्के फॉलोअर्स भारतीय असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे भारतीय युवकांना पाकिस्तानी लेबल का लावत आहेत, असा सवालही दीपके यांनी केला आहे.

दरम्यान, दीपके यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनुसार कॉक्रोच जनता पार्टीचे तब्बल ९४.७ टक्के फॉलोअर्स हे भारतीय असून १ टक्के फॉलोअर्स अमेरिकन आहेत. त्याखालोखाल इंग्लंड, कॅनडा आणि यूएईमधीलही फॉलोअर्स दिसत आहे. या व्हिडीओनुसार पाकिस्तानी फॉलोअर्सचा आकडा १ टक्केही नाही, असे स्पष्ट होते.

वयोमानानुसार विचार केला तर २५ ते ३४ वर्षे वयोगटातील सर्वाधिक फॉलोअर्स असून हा आकडा ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्याखालोखाल १८ ते २४ वयोगटातील २९.५ टक्के फॉलोअर्स आहेत. या आकडेवारीनुसार Gen Z चा सीजेपीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. दीपके यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमधून ही आकडेवारी घेण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT