Maharashtra Karnataka dispute Sarkarnama
देश

Maharashtra Karnataka dispute : राजकारण तापलं; महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड

Maharashtra Karnataka dispute : कर्नाटकात कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Karnataka dispute : महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित केलेल्या मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी (Police) परवानगी नाकारली आहे. तसेच बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन काही निर्णय घेतले होते. परंतु त्या निर्णयांना कर्नाटक सरकारकडून हरताळ फासण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित मेळाव्यासाठी उभारण्यात येत असलेल्या स्टेजच्या उभारणीचे काम थांबवण्यात आले, असून स्टेजच हटवण्यात आहे. काल मेळाव्यास कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र, आज अचानक काम थांबविण्यात आले.

कर्नाटक पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतरही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे. बेळगावचे माजी महापौर, माजी आमदार मनोहर किणेकरांसह काही कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले. यामुळे एक संतापाची लाट कर्नाटक सरकारविरोधात उमटली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलावे. त्यांनी सीमावर्ती भागात ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडायला लावावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. याप्रकरणी लक्ष घालून त्यांना तातडीने सोडायला लावू, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT