Winter Session News : शिंदे गटाच्या खासदारासाठी अजित पवारांनी विधानसभेत उठवला आवाज

विरोधी पक्ष नेते अजित पवार सत्ताधारी यांनी शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या सीमाप्रश्नाच्या मुद्याला धरुन आवाज उठवला.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Assembly Winter Session News : सोमवारी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्याच दिवशी सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये चांगलीच खडाजंगी पाह्यला मिळाली. यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खिंडीत गाठले. तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधारी शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या सीमाप्रश्नाच्या मुद्याला धरुन सभागृहात आवाज उठवला.

आजपासुन (ता. १९) बेळगावमध्ये कर्नाटक विधीमंडळाचे अधिवेशन होत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बेळगावमध्ये महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यासाठी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांसह, लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी १९ डिसेंबर रोजी बेळगावात येण्याची परवानगी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं सांगत त्यांच्या येण्यावर बेळगावात बंदी घातलण्यात आली.

Ajit Pawar News
Winter Session : नागपूर अधिवेशनात शिंदे-फडणवीसांचा मोठा डाव; तब्बल 'एवढी' विधेयकं आणणार

विधानसभेत सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरुन अजित पवार संतप्त होऊन म्हणाले, "सीमावादाप्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांसोबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठकी झाली होती. या बैठकीनंतर आम्ही कोणालाही अडवणार नाही असे ठरलेले असतानाही तेथील जिल्हाधिकारी महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींचे बेळगावामध्ये प्रवेश कसे बंद करु शकतात. कर्नाटकच्या कुरापती अजुणही सुरु आहेच आहेत. या प्रश्नावर योग्य तोडगा निघणे अपेक्षित होते. मात्र, तसे होताना दिसत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

Ajit Pawar News
Sanjay Raut : ''...म्हणून पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली का..?''

महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर लढत आहे. तेथील मराठी भाषिक संघर्ष करत आहेत. यासाठी महाराष्ट्र त्यांच्या बाजुने आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष त्यांच्यासोबत एकमताने उभा हायला हवा, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे अशी भूमिका देखील पवारांनी यावेळी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com