Gautam Adani, Supreme Court Sarkarnama
देश

Adani-Hindenburg Case : सुप्रीम कोर्टाचा अदानींना मोठा दिलासा; तीन महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे ‘सेबी’ला आदेश

Rajanand More

Supreme Court : सुप्रीम कोर्टाने बुधवारी अदानी उद्योगसमुहाला मोठा दिलासा दिला. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात 'सेबी'कडून सुरू असलेल्या चौकशीमध्ये ढवळाढवळ करणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यास सेबी सक्षम असून इतर कोणत्याही एजन्सीला तपासाची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड, न्यायाधीश जे. बी. पारदीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने बुधवारी याबाबतचा निकाल दिला. वर्षभरापुर्वी हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालानंतर भारतीय शेअर बाजारात (Share Market) खळबळ उडाली होती. अहवालात अदानी उद्योगसमुहावर (Gautam Adani) गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर अदानींच्या जवळपास सर्व कंपन्यांचे शेअर गडगडले होते. विरोधकांनीही यावरून मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला होता. (Securities and Exchange Board of India - SEBI)

या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी करण्याची मागणी संसदेत करण्यात आली होती. सुप्रिम कोर्टातही याबाबतची मागणी करणारी याचिका दाखल झाली होती. त्यावर बुधवारी न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, सेबीने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणातील २४ पैकी २२ प्रकरणांचा तपास पूर्ण करण्यात आला असून अजून दोन प्रकरणांचा तपास बाकी आहे. त्याची चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निकाल देताना सरन्यायाधीश म्हणाले, सेबीच्या अधिकार क्षेत्रात कोर्टाला दखल देण्याचे अधिकार कमी आहेत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी सेबीच करेल. एसआयटीकडे तपास सोपवला जाणार नाही. तपास हस्तांतरीत करण्यास कोणताही आधार नाही. नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन होत असेल तर त्याचा विचार केला जाऊ शकतो. कोणत्याही आधाराशिवाय थर्ड पार्टी संस्थेच्या अहवालाला प्रमाण मानून त्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसचे (Congress) खासदार मनिष तिवारी (Manish Tiwari) यांनी सेबीकडे बोट दाखवले आहे. सेबी वर्षभरापासून या प्रकरणाचा तपास करत आहे. पण त्यातून अंतिम काहीच समोर आलेले नाही. आम्ही हेच सांगत आहोत. सेबीला या प्रकरणाचा प्रामाणिकपणे तपास करायचा असता तर काही महिन्यांपुर्वीच चौकशी पूर्ण झाली असती, असे म्हणत तिवारी यांनी सेबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT