India Vs Pakistan Sarkarnama
देश

India Vs Pakistan : या 'ऑपरेशन'मध्ये पाकिस्तानची सरशी; भारताचे डावपेच अपयशी?

Asian Development Bank Approves Major Aid Package for Pakistan : आशियाई विकास बँकेने पाकिस्तानला तब्बल 800 मिलियन डॉलरचे पँकेज मंजूर केले आहे.

Rajanand More

India’s Strategy Under Scrutiny : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. प्रामुख्याने विविध वित्तीय संस्थांनी पाकला कर्ज किंवा इतर कोणत्याही स्वरुपात निधी देऊ नये, यासाठी भारताने विनंती केली. पण भारताचे हे डावपेच अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

आशियाई विकास बँकेने पाकिस्तानला तब्बल 800 मिलियन डॉलरचे पँकेज मंजूर केले आहे. या पॅकेजमध्ये 300 मिलियन डॉलर हा निधी पॉलिसी आधारित कर्ज आणि 500 मिलिनय डॉलर हे प्रोग्राम आधारित हमी स्वरुपात दिला जाणार आहे. रिसोर्स मोबिलायझेशन रिफॉर्म प्रोग्रामअंतर्गत हे पॅकेज देण्यात आले आहे. पाकिस्तानची विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी हे पॅकेज असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांचे सल्लागार खुर्रम शहजाद यांनी सोशल मीडियातून याबाबत माहिती दिली आहे. भारताच्या कुटनीतीसाठी हा धक्का मानला जात आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला तब्बल 8 हजार 500 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले होते. त्यानंतर महिनाभरातय आशियाई बँकही पाकच्या मदतीला धावून गेली आहे.

पाकिस्तानकडून पॅकेजचा गैरवापर केला जाऊ शकतो, अशी भीती भारताने बोलून दाखविली आहे. भारताने पाकिस्तानच्या ढासळलेल्या आर्थिक शिस्तीबाबतचे चित्रही जगासमोर मांडले होते. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर विकासाऐवजी लष्करावर खर्च केला जाईल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

भारतात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तानकडून समर्थन दिले जाते. याबाबतचे पुरावेही भारताने जगासमोर आणले आहेत. वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीचा उपयोग त्यासाठी केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. फायनान्शियल अक्शन टास्क फोर्सचे आर्थिक नियमही पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे पाकचा ग्रे यादीत समाविष्ट करण्यासाठीही भारत मागणी करू शकते. असे झाल्यास पाकिस्तानच्या आर्थिक मदतीवर नियंत्रण राहू शकेल.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT