
Shashi Tharoor's Diplomacy : ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने जगभरातील अनेक देशांमध्ये पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडण्यासाठी शिष्टमंडळे पाठविली आहेत. त्यातील एक शिष्टमंडळ काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत गेले होते. विदेशी कुटनीतीमध्ये तज्ज्ञ असलेल्या थरूर यांनी अत्यंत भक्कमपणे भारताची बाजू मांडली. त्यानंतर तिथे पाकिस्तानचेही शिष्टमंडळ पोहचले. बिलावल भुट्टो यांनी थरूर यांचीच कॉपी करण्याचा प्रयत्न केला पण तोंडावर आपटले.
भारताने विविध देशांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेली शिष्टमंडळे अमेरिकेसह इतर देशांमध्ये पाठविली आहेत. त्यापाठोपाठ पाकिस्ताननेही काही देशांमध्ये शिष्टमंडळ पाठविली आहेत. पण कोणत्याच देशांत त्यांची डाळ शिजताना दिसत नाही. अमेरिकेत गेलेल्या शिष्टमंडळात माजी परराष्ट्र मंत्री भुट्टो यांचा समावेश होता.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे झालेले नुकसान दाखवत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न भुट्टो यांनी न्यूयॉर्कमध्ये केला. थरूर यांच्याप्रमाणेच वेशभूषा केलेल्या भुट्टो यांनी त्यांच्याप्रमाणे बोलण्याचाही प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. उलट त्यांचेच पितळ उघडे पडले आहे.
न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बिलावल भुट्टो यांनी भारतातील मुस्लिमांविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. भारतातील मुस्लिमांना व्हिलन असल्याचे दाखविले जात आहे. प्रामुख्याने पहलगाम हल्ल्यानंतर हे चित्र उभे केले जात असल्याचे भुट्टो यांनी सांगितले. पण काही वेळातच ते तोंडावर आपटले.
पत्रकार परिषदेत एका विदेशी पत्रकाराने ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराने घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला. या पत्रकार परिषदेत मुस्लिम महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी माध्यमांना ऑपरेशनची माहिती दिली होती. हा मुद्दा पत्रकाराने उपस्थित करताच बिलावल यांची बोलती बंद झाली. त्यामुळे बिलावल यांचे मुस्लिमांविषयीचे दावे फोल तिथेच फोल ठरल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, थरूर यांनी संयुक्त राष्ट्रासह विविध देशांमध्ये भारताची एकजुटता, दहशतवाद विरोधी धोरण आणि काश्मीरमधील शांततेच्या मुद्द्यावर ठामपणे देशाची भूमिका मांडली आहे. तथ्य आणि तर्कांच्या आधारे थरूर यांनी मांडलेल्या मुद्द्यांना सर्वच ठिकाणी सकारात्मक प्रतिसादही मिळाला. पण बिलावल यांच्याकडून मात्र कोणत्या तथ्यांशिवाय साधण्यात आलेला संवाद केवळ बाष्कळ बडबड ठरला आहे. त्यांनी केवळ भारताच्या एकतेवर घाव घालण्याचा प्रयत्न केला. त्यातही त्यांना यश मिळाले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.