Fake Milk Deaths Sarkarnama
देश

Fake Milk Deaths : देश हादरला! भेसळयुक्त दुधाने 16 जणांचा बळी; 100 प्लस कुटुंबांत भीतीचं सावट

16 people died after consuming adulterated milk from a dairy in Narasapuram village of Andhra Pradesh Godavari district, triggering panic among locals : आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश खळबळ उडाली असून, इथं भेसळयुक्त दूध प्यायल्याने आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Pradeep Pendhare

Andhra Pradesh Milk Tragedy : आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात घडलेल्या दूध भेसळीच्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. भेसळयुक्त दूध पिल्यामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

लालाचेरुवू, चौदेस्वरनगर आणि स्वरूपनगर या परिसरांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच अनेक लोकांना आजाराची लक्षणे दिसू लागली होती. 22 फेब्रुवारी रोजी काही प्रकरणांची नोंद झाली, त्यानंतर तपास सुरू केल्यावर या आजारामागे धक्कादायक कारण उघड झाले.

स्थानिक डेअरी युनिटमधून पुरवठा करण्यात आलेल्या दुधात (Milk) ‘इथिलिन ग्लायकॉल’ या अत्यंत विषारी रसायनाची भेसळ करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हे रसायन प्रामुख्याने अँटी-फ्रीझ म्हणून वापरले जाते आणि मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे.

हे दूध पिल्यानंतर काही तासांतच नागरिकांना उलट्या, तीव्र पोटदुखी आणि किडनी निकामी होण्यासारखी गंभीर लक्षणे जाणवू लागली. अनेक रुग्णांची प्रकृती इतकी बिघडली की त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून डायलिसिस आणि व्हेंटिलेटरची मदत घ्यावी लागली. या घटनेत लहान मुलं आणि वृद्ध नागरिकांचाही समावेश आहे.

नरसापुरम गावातील एका डेअरीमधून 100हून अधिक कुटुंबांना हे दूध वितरित करण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या (Health) तपासणीत रुग्णांच्या रक्तातील यूरिया आणि क्रिएटिनिनचे प्रमाण अत्यंत वाढलेले आढळले, ज्यामुळे किडनीचे गंभीर नुकसान झाले.

घटनेची माहिती समोर येताच प्रशासनाने तात्काळ दुधाचा पुरवठा बंद केला. बाधित भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. संशयित दूध विक्रेत्याला अटक करण्यात आली असून अन्न सुरक्षा विभागाने डेअरी युनिटमधून दूध, दही, तूप तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. पशुसंवर्धन विभागानेही पशुखाद्य आणि पाण्याची चौकशी सुरू केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ आरोग्य अधिकारी पुढे तपास करत आहेत. या घटनेमुळे अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT