Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची मोठी हालचाल! एसपींना पत्र पाठवलं, अहिल्यानगरमधील ‘त्या’ प्रकरणाची माहिती मागवली

Tukaram Mundhe writes to SP Somnath Gharge seeking details on FIR registered in bogus disability case in Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बोगस दिव्यांगप्रकरणी दाखल गुन्ह्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी पत्र लिहून पोलिस अधीक्षकांकडून मागितल्याने प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Tukaram Mundhe
Tukaram MundheSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Bogus Disability Case : राज्यातील बोगस दिव्यांग प्रकरणाचा पाठपुरावा दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे आपल्या स्टाईलनुसार घेत आहेत. यात जे बोगस दिव्यांग सापडत आहेत, त्यांच्याविरोधात निलंबनाची आणि फौजदारी कारवाईचा सपाटा लावला आहे. तुकाराम मुंढे यांनी तसे प्रशासकीय पातळीवर आदेश काढलेत आहेत.

याच कारवाईत अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर दिरंगाई होत असल्याचं दिसत असल्याने, तुकाराम मुंढे यांनी थेट पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून दाखल गुन्ह्याची (Crime) माहिती मागवली आहे. तुकाराम मुंढे यांच्या या हाचलाचींमुळे अहिल्यानगरमधील प्रशासकीय आणि बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाच्या नावाचा वापर करून सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून काढण्यात आलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रकरणात पोलिसांच्या तपासाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी या दिरंगाई दखल घेतल्याने प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू झाली आहे.

दिव्यांग कल्याण विभागाने या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती, विशेषतः प्रमाणपत्रे कोणत्या आयपी अ‍ॅड्रेसवरून काढण्यात आली, याची सविस्तर माहिती, गतवर्षी मे महिन्यातच पोलिसांना दिली होती. मात्र, इतका काळ लोटूनही पोलिसांनी तपासात कोणतीही ठोस प्रगती केलेली नसल्याने टाळाटाळ होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Tukaram Mundhe
Sagar Moholkar : पैलवान मोहोळकरवरील गोळीबारामागे नीलेश घायवळ गँग कनेक्शन; कानशिलात लगावणं भोवलं!

अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग घोटाळ्याबाबत नागपूर अधिवेशनात चर्चा झाली होती. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी स्वतः अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून शासकीय पोर्टलवरून जी बोगस प्रमाणपत्रे निघाली त्यासंदर्भात 9 सप्टेंबर 2024 रोजी दाखल गुन्ह्याची माहिती मागवली आहे.

Tukaram Mundhe
Abhishek Kalamkar : अभिषेक कळमकर 'त्या' वाहनात? पारनेरमध्ये पाठलागाचा थरार; शेवटी पोलिसांच्या हाती काय लागलं?

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी, युजर आयडी व पासवर्ड हा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडेच असतो. त्यामुळे पोलिसांनी जबाबदारी निश्चित करून कारवाई करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या या अपेक्षावर, अहिल्यानगर पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी, सचिव तुकाराम मुंढे यांच्या सूचनेनुसार कारवाई सुरू आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांची चौकशी केली. पण पासवर्डचा गैरवापर रुग्णालयाबाहेर झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही आयपी अॅड्रेस मागितला. पण त्यात अचूक वेळ मिळाली नसल्याने तपास रखडला आहे, असा दावा करून मोकळे झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com