Datta Meghe death : राजकारण-शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील मोठं नाव हरपलं! भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन

Former BJP MP from Nagpur-Vidarbha, Datta Meghe, passed away due to old age, marking the end of a long and impactful public life : विदर्भातील राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे रविवारी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.
Datta Meghe death
Datta Meghe deathSarkarnama
Published on
Updated on

Nagpur BJP leader death : विदर्भातील राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचा दांडगा अभ्यास असलेले ज्येष्ठ नेते भाजपचे माजी खासदार दत्ता मेघे (वय 90) यांचे आज रविवारी निधन झालं. ते विदर्भातील सार्वजनिक क्षेत्रात 40 वर्षांहून अधिक काळ सक्रिय होते.

दत्ता मेघे यांनी सामाजिक, राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान राहिलं आहे. त्यांच्या पश्चात सागर मेघे व आमदार समीर मेघे ही दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्ता मेघे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

दत्ता मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 ला वर्धा जिल्ह्यातील पवनार इथं झाला. गेले 40 वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय होते. निधनाचे वृत्त कळताच खामला पांडे लेआऊट इथल्या त्यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्ता मेघे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.

Datta Meghe death
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची मोठी हालचाल! एसपींना पत्र पाठवलं, अहिल्यानगरमधील ‘त्या’ प्रकरणाची माहिती मागवली

बिकट सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे आलेले दत्ता मेघे यांनी विदर्भातील राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती. आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमध्ये (Congress) केली. वर्धा, रामटेक, नागपूर लोकसभा मतदार संघातून चार वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले. राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. ते तीन वेळा विधान परिषद सदस्य आणि मंत्रीही होते.

Datta Meghe death
NCP Political Clash : अंगठ्यापासून बुवाबाबांपर्यंत राजकारण तापलं; तटकरे अन् परांजपेंवर 'तुमचे गंडेदोरे, तुमचे बुवा' लवांडेंचा जोरदार वार

2014ला भाजपमध्ये प्रवेश

2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पुलोद सरकारमध्ये ते विदर्भातून मंत्री होते. 1991 मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला. यानंतर रामटेक 1996 व वर्धा 1998 या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले.

मेघेच्या मृत्यूपत्रात गडकरींचे नाव

दत्ता मेघे आणि नितीन गडकरी यांची मैत्री अनोखी होती. माजी खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी आपल्या मृत्युपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव टाकले आहे. खुद्द मेघे यांनी ही माहिती 19 ऑक्टोबर 2021 रोजी वर्धा इथं आयोजित जाहीर कार्यक्रमात दिली. "सर्व पक्षांशी मी चांगले संबंध प्रस्थापित केले. नितीन गडकरी आमच्या फॅमिलीचे महत्वाचे नेते आहेत. मी माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये म्हणून त्यांचे नाव दिले आहे', असे मेघे यांनी तेव्हा सांगितले होते.

माझे बंधू गेले; गडकरी गहिवरले

माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे असलेले दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. दत्ताभाऊंच्या जाण्याने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दातृत्व अंगी असलेला असा मोठ्या आणि निर्मळ मनाचा नेता पुन्हा होणे नाही. विदर्भातील शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील दत्ताभाऊंचे योगदान उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. विदर्भातील तरुणांना उच्चशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली. लहान बंधू प्रमाणे त्यांनी नेहमीच माझ्यावर प्रेम केले, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी त्यांच्या निधनावर व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com