MP Maneka Gandhi
MP Maneka Gandhi 
देश

भाजपनं डच्चू दिलेल्या मनेका गांधी अखेर बोलल्या...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भाजपने (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीतून माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी (Maneka Gandhi) यांच्यासह त्यांचे पुत्र खासदार वरूण गांधी (Varun Gandhi) यांनाही वगळलं आहे. मनेका गांधी यांना मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलेलं नाही. लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथील घटनेवर वरूण यांनी सतत भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. त्यानंतर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. आता यावर मनेका गांधी यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजपने मागील आठवड्यात गुरूवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीमधून वरूण गांधींसह त्यांच्या आई खासदार मनेका गांधी यांनाही वगळण्यात आलं आहे. तर काही महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व मिथुन चक्रवर्ती यांना कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे. वरूण गांधी यांनी लखीमपूर खीरी येथील घटनेनंतर सातत्याने दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी घटनेचे दोन व्हिडीओ ट्विटवर शेअर केले आहेत. गुरूवारी सकाळीही एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी अजय मिश्रा यांना अडचणीत आणले आहे. आपल्या ट्वीटर वरुण गांधी यांनी घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या घडामोडींबाबत बोलताना मनेका गांधी म्हणाल्या, मागील वीस वर्षांपासून मी भाजपमध्ये असून समाधानी आहे. कार्यकारिणीमध्ये समावेश केला नाही म्हणून माझी राजकारणातील उंची कमी होत नाही. लोकांसा सेवा करणं हा माझा पहिला धर्म आहे. लोकांच्या मनात स्थान मिळवणं, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे.

पक्षामध्ये इतरही ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना कार्यकारिणीमध्ये स्थान मिळालेलं नाही, असं सांगत मनेका गांधी म्हणाल्या, नवी लोकांना संधी मिळालया हवी. मला माझे काम माहित आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांची सेवा करणे हे माझे पहिले कर्तव्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुलतानपूर या त्यांच्या मतदारसंघात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या असताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

दरम्यान, कार्यकारिणीतून वगळल्यानंतर वरूण गांधी यांनी रविवारी लखीमपूर घटनेवर पुन्हा ट्विट केले होते. लखीमपूर खीरी येथील हिंसेनंतर या प्रकरणाला हिंदू विरूद्ध असे रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे अत्यंत चुकीचे असून लोकांना भ्रमित करणाचा प्रयत्न आहे. अशाप्रकारचं वागणं धोकादायक आहे. यामुळे पुन्हा एकदा जखमा ताज्या होतील. राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रीय एकता पणाला लावू नये, असं गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT