eGazette Website Sarkarnama
देश

CAA Notification : सीएए कायद्याची अधिसूचना अन् काही क्षणांतच सरकारची 'ही' वेबसाइट क्रॅश

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी CAA ची अंमलबजावणी केल्याने निवडणुकीत फायदा होण्याची भाजपला आशा

Sunil Balasaheb Dhumal

BJP Political News : आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांनी लागू होणार आहे. त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपला एकहाती सरकार स्थापन करण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे. देशभरात सोमवारपासून बहुचर्चित नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्यात आला. याबाबतचे नोटिफिकेशन केंद्र सरकारने जारी केले. केंद्राने या कायद्याच्या अंमलबजावणीची अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर काही क्षणांतच सरकारची ई गॅझेट प्रसिद्ध होणारी वेबसाइट क्रॅश झाली. (Latest Political News)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काही दिवसांपूर्वीच CAA च्या अंमलबजावणीबाबत संकेत दिले होते. तसेच भाजपच्या 2019 च्या जाहीरनाम्यातही याचा उल्लेख केलेला होता. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचा फायदा निवडणुकीत होईल, अशी आशा भाजपला (BJP) असल्यानेच हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CAA चे नियम eGazette वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर काही क्षणांतच ही वेबसाइट क्रॅश झाली. याबाबत ट्विटरवर अनेकांनी उल्लेख केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सीएएच्या अधिसूचना प्रसिद्ध होताच ई गॅझेट वेबसाइट क्रॅश झाल्याकडे लक्ष वेधले. दरम्यान, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सीएए अधिसूचना जारी केल्याबाबत देशभरातून विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, 11 डिसेंबर 2019 रोजी संसदेने लागू केलेल्या CAA चा उद्देश अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, जैन, पारशी, बौद्ध आणि ख्रिश्चन समुदायातील स्थलांतरितांसाठी जलद गतीने भारतीय नागरिकत्व देणे आहे. 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी संबंधित देशात धार्मिक छळाचा बळी पडलेल्या नागरिकांना या कायद्याच्या आधारे भारतात प्रवेश देण्यात येणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT