Modi Cabinet Reshuffle:
Modi Cabinet Reshuffle:  Sarkarnama
देश

Modi Cabinet Reshuffle: किरेन रिजिजूनंतर आणखी एका केंद्रीय मंत्र्याला पदावरुन हटवलं

सरकारनामा ब्युरो

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात आज (18 मे) अचानक फेरबदल करण्यात आले. आज सकाळीच केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना पदावरुन हटवत त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता केंद्रीय कायदे राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांनाही पदावरुन हटवण्यात आले आहे. बघेल यांच्याकडे आरोग्य मंत्रालयात राज्यमंत्री पदाचा कारभार देण्यात आला आहे. (After Kiren Rijiju, another Union Minister was sacked)

अर्जुन राम मेघवाल यांना त्यांच्या सध्याच्या पोर्टफोलिओ व्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. मेघवाल सध्या संसदीय कामकाज राज्यमंत्री आणि सांस्कृतिक राज्यमंत्री आहेत. मेघवाल यांना त्यांच्या विद्यमान खात्यांव्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. (Modi Cabinet Reshuffle)

राष्ट्रपती भवनाने याबाबक निवेदन जारी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या जागी एसपी सिंह बघेल यांची आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. (National News)

न्यायालयीन नियुक्त्यांवरून सर्वोच्च न्यायालयाशी वाद घालणारे रिजिजू 7 जुलै 2021 रोजी कायदा मंत्री झाले. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या राजीनाम्यानंतर क्रीडामंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री रिजिजू यांना ही जबाबदारी मिळाली.

एसपी सिंह बघेल हे आग्रा लोकसभेचे खासदार आहेत. याआधी ते उत्तर प्रदेश विधानसभेत टुंडला येथून आमदार होते आणि राज्यातील योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना आग्रा येथून तिकीट देण्यात आले आणि ते खासदार म्हणून निवडून आले. त्याच वेळी, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत, बघेल यांना भाजपने करहल विधानसभा मतदारसंघातून अखिलेश यादव यांच्या विरोधात उभे केले होते, जिथे त्यांनी सपा प्रमुखांना कडवी झुंज दिली होती. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT