Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानातून बाहेर पडलल्यानंतर तासाभरातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत शहांनी केवळ राजकीयच नव्हे तर राज्यातील इतर मुद्यांवरही चर्चा केली. मोदींसारखेच शहांकडेही सदिच्छा भेटीसाठी आपण आलो असल्याचं शिंदेंनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची कुटुंबासह भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लगेचच शहांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज्यात पुन्हा काही राजकीय घडामोडी घडणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण देत ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं.
राज्यात विविध ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर लावण्यात आलेत. त्यातच अमोल मिटकरींनी "मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व", अशा आशयाचं ट्विट केलं.
एकीकडे मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर तर दुसरीकडे अमोल मिटकरीचं ट्विट आणि अजितदादांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून लावलेले बॅनर, यामुळे राज्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र, पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण देत आपण सदिच्छा भेट घेतली असल्याचं सांगितलं. त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांवर पडदा पडला.
या भेटीदरम्यान मोदींनी रायगडमधील इर्शाळवाडीत घडलेल्या दरड कोसळल्याच्या दुर्घटनेसंदर्भात माहिती घेत घटनेविषयी संवेदना व्यक्त केल्या. यानंतर अमित शहांनीही राज्यातील एकूण परिस्थितीचा आढावा जाणून घेतला.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.