MLA Sanjay Gaikwad  Sarkarnama
देश

MLA Sanjay Gaikwad : आमदार गायकवाडांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार; किती अंगलट येणार अन् काय कारवाई होणार?

Pradeep Pendhare

Mumbai News : काँग्रेस नेता तथा लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरोधात महायुतीमधील नेत्यांच्या प्रक्षोभक विधानांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह महायुतीमधील चार नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार केली असून, यात दोन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

काँग्रेस नेते अजय माकन यांनी ही तक्रार दिली. दरम्यान, महाराष्ट्रात देखील महायुतीमधील नेत्यांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे.

काँग्रेस नेते अजय माकन यांनी दिल्लीतील तुघलक रोडवरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात ही तक्रार आहे. या तक्रारीत महायुतीमधील आणखी दोन नेत्यांची नावे आहेत. त्यातील एक केंद्रीय मंत्री आहे. दिल्ली पोलिसांकडे दाखल तक्रारीवर काय होणार आणि आमदार संजय गायकवाड यांची दिल्ली पोलिस चौकशी करणार का? असे प्रश्न आता समोर येत असून त्यावर चर्चा सुरू आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेरिका दौऱ्यावर असताना आरक्षण आणि शीख समाजाविषयी चिंता व्यक्त करणारं विधान केलं होते. या विधानावर टीका करताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा केली. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्या 11 लाख रुपयांचं बक्षीस देणार, असं जाहीर केलं. संजय गायकवाड यांच्या या विधानावर महाविकास आघाडीकडून टीका झाली. मात्र दिल्लीतील काँग्रेस नेते अजय माकन यांनी या विधानावरून दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली आहे. संजय गायकवाड यांच्यासह चार नेत्यांविरोधात तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल केली आहे.

प्रक्षोभक विधानांची स्पर्धा

आमदार सजंय गायकवाड यांनी बुलडाणा इथं पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या मुद्यावर टीका केली होती. त्यावेळी आमदार गायकवाड यांची टीका करताना जीभ घसरली आणि राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा केली. आमदार गायकवाड यांच्या या टीकेनंतर महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्याविरोधात महायुतीमधील नेत्यांमध्ये प्रक्षोभक विधान करण्याची स्पर्धाच सुरू झाल्या दिसते. आमदार गायकवाड यांच्यानंतर आता राज्यसभेतील भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींविरोधात प्रक्षोभक विधान केलं आहे.

महाराष्ट्रासह दिल्लीत तक्रारी

राहुल गांधी यांच्या जीभेला चटके देण्याची भाषणा खासदार बोंडे यांनी केले. राहुल गांधींविरोधातील महायुतीमधील नेत्यांच्या प्रक्षोभक विधानांवर काँग्रेसने सुरवातीला चिंता व्यक्त केली. परंतु प्रकार वाढल्याने आता काँग्रेस आक्रमक झाली असून, प्रक्षोभक विधान करणाऱ्या नेत्यांविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या जात आहेत. आमदार गायकवाड आणि खासदार बोंडे यांच्याविरोधात महाराष्ट्रात काँग्रेसकडून तक्रारी दाखल होत आहेत, तर दिल्ली पोलिसांकडे देखील तक्रारी दाखल होत असल्याने महायुतीमधील नेत्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT