Nilesh Lanke On Election Commission Sarkarnama
देश

Nilesh Lanke On Election Commission : 'मतचोरी झाली नसती, तर लोकसभेला देखील वेगळं चित्र असतं'; नीलेश लंकेंचा दिल्लीत मोठा दावा

Nilesh Lanke Reacts After Joining INDIA Alliance March Against Election Commission Led by Rahul Gandhi : इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्ली निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चात खासदार नीलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Nilesh Lanke reaction : इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी दिल्लीच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा नेला आहे. हा मोर्चा दिल्ली पोलिसांनी अडवला. मोर्चा अडवल्यानंतर खासदार चांगलेच आक्रमक झाले होते.

दिल्ली पोलिसांबरोबर वाद देखील झाला. पोलिसांनी शेवटी बळाचा वापर करत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरमधील खासदार नीलेश लंके यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली.

खासदार नीलेश लंके म्हणाले, "काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली हा इंडिया आघाडीच्या खासदारांचा हा मोर्चा आहे. मत चोरीवर निवडणूक आयोग गप्प आहे. यातून त्यांची भूमिका काय आहे, ते स्पष्ट होते". लोकसभेला इंडिया आघाडीच्या बाजूने वातावरण होते. परंतु मत चोरी झाली. नाहीतर लोकसभेला देखील देशात वेगळे चित्र असते, असा दावा खासदार लंके यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यालयाकडे जात असताना, मोर्चाला दिल्ली पोलिसांनी अडवले. त्यावेळी खासदार चांगलेच आक्रमक झाले होते. काही खासदार बॅरिकेड्सवर चढून जोरदार घोषणा केली. त्यावेळी दिल्ली पोलिसांशी खासदारांची झटापट झाली. यात शरद पवार यांच्याशी देखील झटापट झाली. तशी चर्चा होती. लोकसभा आणि राज्यसभा, दोन्ही सभागृहातले 300 खासदार मोर्चात सहभागी झाले होते.

नीलेश लंके यावर, 'दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर केला. परंतु शरद पवार यांना कोणत्याही प्रकारची झटापट झाली नाही. मी त्यांच्याबरोबर आहे. कोणालाही जवळ येऊ दिले नाही', असे सांगितले.

खासदार आक्रमक झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी इंडिया आघाडीचे प्रमुख तथा काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, डिंपल यादव, सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे, संजय राऊत यांच्यासह प्रमुख खासदारांना ताब्यात घेतले. याच दरम्यान, एका महिला खासदार भोवळ येऊन पडल्याने गोंधळ उडाला. राहुल गांधी यांनी त्यांना मदत करत, पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

अखिलेश यादव कडाडले

समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव देखील मोर्चात सहभागी झाले होते. त्यांनी आयोगाच्या कारभारावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले. 'आमच्या तक्रारीचं निवारण निवडणूक आयोगाने केलं पाहिजे. पण आम्हाला इथे अडवलं जातं आहे. उत्तर प्रदेशातही मतांची लूट केली जाते आहे. आम्हाला संसदेत आमचं म्हणणं मांडायचं आहे. पण विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो', असा आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT