
India election controversy : काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरी मुद्दा चांगलाच तापला आहे. पुराव्यासह समोर आणल्यानंतर त्यावरून देशभरात गदारोळ सुरू असून, निवडणूक आयोगाच्या कामकाजावर सवाल केले जात आहेत.
लोकसभेच्या संसद अधिवेशनात यावरून चांगलाच गदारोळ सुरू आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्ली मोर्चा काढला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी मत चोरीच्या मुद्यावर निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र मागितले आहे. प्रतिज्ञापत्र द्या नाही, तर माफी मागा, अशी आक्रमक भूमिका निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतली आहे. राहुल गांधींच्या आरोपांवर कारवाईसाठी निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र मागण्याच्या भूमिकेवरून वादंग निर्माण झाला आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावरून निवडणूक आयोगाचा कारभार म्हणजे, ‘गिरे तो भी टांग उपर’, असला प्रकार आहे, असा घणाघात केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. यात त्यांनी टी. एन. शेषण यांची आठवण करून देत, कुठं आजचा निवडणूक आयोग, असा सवाल केला आहे.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाने कुणाच्या मनाप्रमाणे नाही, तर पाठीचा कणा असल्याप्रमाणे निष्पक्ष राहणं अपेक्षित आहे. पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मतचोरीचा जाहीर पंचनामा केला. तरीही आयोग मात्र धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असल्याचा आव आणत उलट राहुल गांधी यांच्याकडंच शपथपत्राची मागणी करतोय".
निवडणूक आयोगाची ही भूमिका म्हणजे, ‘गिरे तो भी टांग उपर’, असला प्रकार आहे आणि आता तर वगळलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यास बांधिल नसल्याचं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात देऊन निवडणूक आयोग नेमकं काय लपवत आहे? आणि कुणासाठी लपवत आहे? असे प्रश्न देखील रोहित पवार यांनी केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.