Timeline of Major Airplane Crashes in India -गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक अत्यंत भीषण विमान दुर्घटना घडली. लंडनला निघालेले एअर इंडियाचे प्रवासी विमान टेक ऑफ घेताच काही अंतरावर कोसळले. ज्यामुळे भीषण स्फोट झाला, प्राप्त माहितीनुसार स्फोट झालेल्या विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर जवळच असलेल्या मेघानीच्या निवासी भागात कोसळले. यानंतर भीषण स्फोट झाला, आगीच्या ज्वाळा उठल्या व काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहे. अग्निशमन दल व एनडीआरफ पथकं मदत व बचाव कार्यात गुंतलेली आहे. पंतप्रधान मोदींनीही या दुर्घटनेची माहिती घेतली असून, केंद्र पातळीवरून परिस्थितीवर बारकाईन लक्ष ठेवले जात आहे. या दुर्घटनेमुळे अवघ्या देशात खळबळ उडाली आहे.
या आधी १९८८ मध्येही अहमदाबाद विमानतळावर अशीच भीषण दुर्घटना घडली होती. त्यानंतर मुंबईहून अहमदाबादला येणारे इंडियन एअरलाइन्सचे विमान विमानतळाजळवच कोसळले. या घटनेत १३३ जणांना जीव गमावावा लागला होता. या पार्श्वभूमीवरच आपण भारतातील प्रवासी विमान अपघातांशी संबंधित घटनांबद्दल जाणून घेऊया.
अहमदाबाद विमानतळाजवळच १९ ऑक्टोबर १९८८ मध्ये ‘इंडियन एअरलाइन्स फ्लाइट 113’ क्रॅश झाले होते. या दुर्घटनेत १३३ जणांचा मृत्यू झाला होता. बोईंग ७३७-२०० विमानाने विमानाने सकाळी ६.०५ वाजता मुंबईहून उड्डाण केले होते. सकाळी ६.२० वाजता कमी दृश्यमानतेमुळे पायलटने अहमदाबाद विमानतळावरूनच हवमानाची माहिती मागितली. तथापि, अहमदाबाद विमानतळवार पोहचल्यानंतर, पायलटने लँडिंगची परवानगी मागितली नाही आणि सकाळी ६.५३ वाजता ते चिलोडा कोतारपूरजवळ एका झाडावर व वीज ट्रान्समिशन टॉवरवर आदळले.
असे सांगितले जाते की, कॉकपिटमध्ये असलेल्या व्हॉइस रेकॉर्डवरून असे दिसून आले की विमानातील दोन्ही पायलट कमी दृश्यमानतेमुळे धावपट्टी शोधण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान, ते विमान खाली आणत होते. यावेळी विमान एक हजार फूट उंचीवर असताना, ते वीज ट्रान्समिशन टॉवरशी आदळले व विमानतळापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर कोसळले.
-भारतात १९३८मध्ये घडली होती पहिली विमान दुर्घटना. मध्य प्रदेशमधीत दतिया येथे ७ मार्च १९३८मध्ये एअर फ्रान्स विमान कोसळे होते. ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता. व्हिएतनामच्या हनोई येथून पॅरिसला जाणाऱ्या विमानत आग लागली होती. या दुर्घटनेत तीन क्रू मेंबर्स व चार प्रवाशांचा जीव गेला होता.
- महाराष्ट्रातील लोणावळा येथे १४ ऑगस्ट १९४३ रोजी टाटा नॅशनल एअरलाइन्सचा अपघात झाला होता. ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. टाटा नॅशनल एअरलाइन्सचे स्टिन्सन मॉडेल एक प्रवासी विमान लोणावळातील डोंगरांवर आदळले होते, ते कोलंबोहून कराचीला जात होते.
-१२ जुलै १९४९ रोजी खराब हवामानत लँडिंगच्या प्रयत्नात असताना मुंबईतील घाटकोपर येथे विमान दुर्घटना घडली होती. ज्यामध्ये एकूण ४५ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये दहा क्रू मेंबर्स आणि ३५ प्रवाशांचा समावेश होता.
-एलिटालिया फ्लाइट 771 दुर्घटना ७ जुलै १९६२ रोजी महाराष्ट्रातील जुन्नरमध्ये घडली. या भीषण दुर्घटनेत ९४ जणांचा मृत्यू झाला होता. ऑस्ट्रेलियातील सिडनीहून रोम, इठलीकडे जाणारे विमान चुकीच्या दिशेने गेल्यानंतर मुंबईपासून सुमारे ८४ किलोमीटर अंतरावर एका लहान टेकडीवर आदळले होते.
-२८ जुलै १९६३ रोजी मुंबई विमानतळावर दुर्घटना घडली होती. ज्यामध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला होता. खराब हवामानामुळे टर्बुलेंस दरम्यान वैमानिकास विमान नियंत्रित करता आले नाही आणि भीषण अपघात घडला होता.
-२६ एप्रिल १९९३ रोजी इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट ४९१ औरंगाबादहून मुंबईला निघाले होते. विमानाने उड्डाण करताच धावपट्टीच्या टप्प्यात एक ट्रक आला, पायलटला वेळेत ट्रक दिसला नाही आणि विमानत त्याला धडकले, यानंतर भीषण स्फोट झाला या दुर्घटनेत ५५ जणांचा मृत्यू झाला होता.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.