Boeing 787 accident : अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या विमानामध्ये भारतीय नागरिकांप्रमाणेच परदेशी नागरिकही प्रवास करत होते. अद्याप अपघातातील मृतांचा आकडा समोर आलेला नाही. मात्र, मोठी जीवितहानी झाली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विमानातील पायलट आणि को पायलटची माहिती समोर आली आहे.
अहमदाबाद मधून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या या विमानाच्या पायलटचे नाव कॅप्टन सुमीत सभरवाल असे आहे. नागरी विमान उड्डाणाचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांना ८ हजार २०० तास विमान चालविण्याचा अनुभव आहे. कॅप्टन सभरवाल यांनी अपघातापूर्वी एक आपत्कालीन संदेश नियंत्रण कक्षाला पाठवला होता. पण नंतर त्यांचा संपर्क तुटला. अशी महत्वाची माहिती समोर आली आहे.
अपघातग्रस्त विमानाबाबतही महत्वाची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाचे बी७८७ ड्रीमलायनरचा भीषण अपघात झाला आहे. हे विमान एअर इंडियाच्या ताफ्यात २०१३ मध्ये दाखल झाले होते. या विमानाचे डिसेंबर २०१३ मध्ये पहिले उड्डाण झाले होते. तेव्हापासून हे विमान एअर इंडियाच्या सेवेत जवळपास १२ वर्षे होते.
उड्डाणानंतर काही मिनिटांतच हे विमान नागरी वस्तीत कोसळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला. या अपघातात किती जीवितहानी झाली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विमानामध्ये १६९ भारतीय नागरीक प्रवास करत होते. तसेच १ कॅनेडियन, ७ पोर्तुगीज, आणि ५३ ब्रिटीश नागरिक प्रवास करत होते. प्रवाशांमध्ये ११ लहान, २ नवजात बालक आणि २१७ ज्येष्ठ नागरिक होते.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही या विमानातून प्रवास करत होते. विमानातील प्रवाशांची माहिती समोर आली असून त्यामध्ये रुपाणी यांचेही नाव आहे. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.