Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अपघातग्रस्त विमानामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

Plane Crash Vijay Rupani : अपघातग्रस्त विमानातून विजय रुपानी प्रवास करत होते. त्यांचा बोर्डींग पास देखील समोर आला आहे.
Scene from the Air India crash site in Ahmedabad; former CM Vijay Rupani was among the passengers.
Scene from the Air India crash site in Ahmedabad; former CM Vijay Rupani was among the passengers. sarkarnama
Published on
Updated on

Plane Crash News : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाचे इंग्लंडला निघालेले प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळले. जेथे विमान कोसळले होत भाग देखील रहिवासी आहे. प्राथामिक माहितीनुसार विमानत तब्बल 242 प्रवासी होते. याच विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.

रुपानी यांच्या विमानप्रवासाचा बोर्डिंग पास देखील समोर आला आहे. विमान कोसळल्यानंतर त्यांचे फोटो समोर आले आहेत. या भीषण अपघातामध्ये विमानाचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघातग्रस्त विमान बोईंगचे 787 ड्रीमलायनर असल्याचे सांगितले जात आहे हे विमान तब्बल 11 वर्षे जुने होते. दरम्यान, विजय रुपानी यांचा बोर्डिंग पास समोर आल्याने ते या विमानातून प्रवास करत असल्याचे उघड झाले आहे. प्रशासनाने अहमदाबाद विमानतळ बंद ठेवले आहे.

प्रकृतीबाबत अपडेट नाही...

माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे विमानाने प्रवास करत होते. ते विमानाच्या सीटच्या दुसऱ्या रांगेत बसल्याची माहिती आहे. या अपघातानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी प्रशासनाकडून कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. विमान रहिवाशी भागात कोसळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

Scene from the Air India crash site in Ahmedabad; former CM Vijay Rupani was among the passengers.
Ladki Bahin Yojana : तब्बल 20 लाख लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर? इन्कम टॅक्स डेटा आला; तपासणीही सुरू

विजय रुपानींचा राजकीय प्रवास

विजय रुपानी हे गुजरात भाजपमधील मोठे नेते म्हणून ओळखले जातात. आनंदीबेन पटेल यांनी 2016 मध्ये राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर, 2017 मध्ये भाजप विधानसभा निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेत आला तेव्हा सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. 26 डिसेंबर 2017 ला त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती.

पक्ष आदेश अन् राजीनामा

सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले रुपानी यांना पक्षाने 2021 मध्ये विधानसभा निवडणुकीच्याआधी राजीनामा देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी 11 सप्टेंबर 21021 मध्ये आपला राजीनामा दिला त्यानंतर त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली.

Scene from the Air India crash site in Ahmedabad; former CM Vijay Rupani was among the passengers.
Pune News : मुस्लिम धार्मिक स्थळांवर 7 गावांमध्ये प्रवेशबंदी; ग्रामसेवक आणि सदस्य अडचणीत येणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com