Former CM Vijay Rupani  sarkarnama
देश

Air India Plain Crash: एअर इंडिया विमान अपघात: मृतांच्या नातेवाईंकांना खटला दाखल न करण्यासाठी दबाव? विजय रुपानींच्या मुलीमुळं मोठा खुलासा

Air India Plain Crash: गुजरातच्या अहमदाबादेत १२ जून २०२५ रोजी कोसळलेल्या एअर इंडियाच्या AI-171 ड्रीमलाईनर या विमान अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता.

Amit Ujagare

Air India Plain Crash: गुजरातच्या अहमदाबादेत १२ जून २०२५ रोजी कोसळलेल्या एअर इंडियाच्या AI-171 ड्रीमलाईनर या विमान अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता. या अपघाताची अद्यापही चौकशी सुरु असून अद्याप अंतिम चौकशी अहवाल आलेला नाही. पण तत्पूर्वीच एअर इंडियाकडून या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना अंतिम नुकसान भरपाई वाटप सुरु केलं आहे, ते देखील कंपनीविरोधात कायदेशीर खटला दाखल न करण्यासाठी एअर इंडियाकडून या नातेवाईकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप विजय रुपानी यांच्या मुलीनं केला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली, पण यावर एअर इंडियानं देखील स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमका विषय काय?

विजय रुपानी यांची मुलगी राधिका मिश्रा ही लंडनमध्ये वास्तव्याला आहे. त्यांनी टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांना ई-मेल लिहून आरोप केला की, एअर इंडिया अधिकृत अंतिम चौकशी अहवालाविना मृतांच्या कुटुंबियांकडून 'फुल अँड फायल सेटलमेंट'च्या कागदपत्रांवर सह्या करुन घेत आहेत. त्यांचा आरोप होता की, एअरलाईन्सवर कायदेशीर खटला दाखल न करण्याच्या अटीवर ही नुकसान भरपाई दिली जात आहे.

एअर इंडियाचा आरोपांचा इन्कार

दरम्यान, विजाय रुपानी यांच्या मुलीनं केलेल्या आरोपांवर एअर इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. एअर इंडियानं सांगितलं की, कोणत्याही पीडित कुटुंबाला किंवा व्यक्तीला निश्चित कलावधीमध्ये नुकसान भरपाई स्विकार करण्यासाठी कोणताही दबाव नाही. आम्ही चौकशी पूर्ण होण्याची वाट पाहत आहोत, त्यामुळं हा अंतिम चौकशी आहवाल येण्याची वाट पाहून आपले निर्णय घेण्यासाठी नातेवाईक पूर्ण स्वतंत्र आहेत. कागदपत्रांवर स्पष्टीकरण देताना एअर इंडिायानं सांगितलं की, पावती, डिस्चार्ज आणि इंडेम्निटी या कागदपत्रांचा उद्देश केवळ हे निश्चित करण्यासाठीचा आहे की नुकसान भरपाई अंतिम व्हावी. तसंच कंपनी भविष्यात कोणत्याही अतिरिक्त कायदेशीर दाव्यांपासून सुरक्षित राहावी. टाटा समुहानं तयार केलेल्या AI-171 स्मारक निधीच्या माध्यमातून पीडित कुटुंबांना १ कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य यापूर्वीच दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT