Mamata Banerjee: ममतांना पुन्हा एक झटका! शिल्लक राहिलेल्या आणखी एका जुन्या खासदारानं सोडली साथ

TMC Mamata Banerjee: ममता बॅनर्जी या सध्या पक्षाच्या डॅमेजसाठी दररोजच चर्चेत येत आहेत, आज पुन्हा एकदा त्यांची एका खासदारानं साथ सोडली.
Mamata Banerjee
Mamata Banerjeesarkarnama
Published on
Updated on

Mamata Banerjee: पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसवर आभाळ कोसळलं आहे. कारण ममतांची साथ सोडण्यात दररोज एका सदस्य लोकप्रतिनिधीची भर पडत आहे. त्यात आता आणखी एका खासदारानं ममता बॅनर्जी यांची साथ सोडली.

Mamata Banerjee
Bomb Threat: मुंबई, पुण्याच्या महापौरांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ई-मेल; महापालिकेची इमारत केली रिकामी; नागपूरमधील ठिकाणंही टार्गेटवर

खासदार सुश्मिता देव यांचा राजीनामा

चार दिवसांपूर्वी ममतांचे विश्वासू सहकारी असलेले राज्यसभेचे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि खासदारकीची राजीनामा दिला होता. त्यानंतर आज आणखी एका राज्यसभा खासदार सुश्मिता देव यांनी खासदारकीचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा उपराष्ट्रपती के. राधाकृष्णन यांनी स्विकारला आहे. देव या पूर्वी काँग्रेसच्या लोकसभा खासदार होत्या, आसामच्या सिलचर मतदारसंघातून त्या निवडून आल्या होत्या. २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि २०२१ मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अल्पावधितच त्या ममतांच्या जवळच्या सहकारी बनल्या. ममतांनी त्यांना तृणमूलच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्त केलं. त्यानंतर त्यांना राज्यसभेत खासदारही बनवलं.

Mamata Banerjee
Shivsena Nashik : आरोप झालेल्या नेत्याला आदित्य ठाकरेंचे पाठबळ, मुंबई गाठताच पदोन्नतीचे गिफ्ट !

हिमंता सर्मांची घेतली भेट

आज राजीनामा दिल्यानंतर त्यांनी दिल्लीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांची भेट घेतली. याचाच अर्थ आता त्या भाजपत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. भाजपत प्रवेश केल्यानंतर आसाममधील एका लोकसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. जर इथून त्या निवडून आल्या तर त्या आता लोकसभेच्या भाजपच्या खासदार बनतील.

Mamata Banerjee
Nashik MLC Election: गोकुळ गितेंचा करारी बाणा! म्हणाले, महाजनांचा अन् माझा संबंध नाही, कोणीही भेटायला येऊ द्या माघार नाही; दराडेंचं वाढलं टेन्शन

एकाचवेळी दोन नावेतून प्रवास नको - देव

इंडिया टुडेशी चर्चा करताना सुश्मिता देव यांनी सांगितलं की, माझं पॉलिटिकल करिअर हे आसाममध्ये आहे बंगालमध्ये नाही. तृणमूलच्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा का दिला? यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, यामागे माझे वैयक्तिक आणि राजकीय कारणं आहेत. मी कुठल्या ठिकाणाहून राजकारण कारायचं आणि ते का करायचं हा माझा वैयक्तिक अधिकार आहे. जर मी माझी तृणमूल काँग्रेसचं सदस्यत्व सोडलं म्हणजे सहाजिकच मी माझी राज्यसभेची जागाही सोडल्यासारखंच आहे. तृणमूल काँग्रेस सोडण्यामागं मोठी गोष्ट आहे, मला एकाच वेळी दोन नावेत पाऊल ठेवण्याची कसरत करायची नव्हती. मला ममता दीदींवर काहीही भाष्य करायचं नाहीए.

Mamata Banerjee
Congress News: मल्लिकार्जुन खर्गेंची खुर्ची धोक्यात: संकटात सापडलेल्या मित्रपक्षानं टाकला डाव, सोनिया गांधींनाच दिला नवा प्रस्ताव

तृणमूल काँग्रेस पक्ष असा फुटला

दरम्यान, आठवडाभरात तृणमूलच्या दोन खासदारांनी राजीनामा आणि पक्षाचं सदस्यत्वही सोडलं आहे. याव्यतिरिक्त तृणमूलचे २८ पैकी २० खासदार यांनी बंड केलं असून आपला पक्षांतर्गत स्वतंत्र गट स्थापन केला आहे. तसंच या गटाला लोकसभेत मान्यता द्यावी अशी विनंतीही त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडं केली आहे. त्याचबरोबर आमच्या गटाला भाजपप्रणित एनडीत समाविष्ट व्हायचं आहे असं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे. तत्पूर्वी बंगालमधील तृणमूलच्या ८० आमदारांपैकी ६० आमदारांनी देखील ममता बॅनर्जींची साथ सोडली असून त्यांनीही विधानसभेत ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट स्थापन केला असून विधानसभा अध्यक्षांनी त्यांना मान्यताही दिली आणि ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधीपक्ष नेता म्हणून नियुक्तही केलं आहे. या सर्व घडामोडींमुळं आता काही मोजक्याच आमदार आणि खासदारांसह ममता बॅनर्जी काहीशा एकट्या पडल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com