PM Modi_Aishwarya Rai 
देश

Aishwarya Rai: ऐश्वर्या रॉय PM मोदींच्या पडली पाया! मोदींचं कौतुक करताना जात-धर्मावर मांडले परखड विचार

Aishwarya Rai: दिवंगत सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी इथं आयोजित एका कार्यक्रमात विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिनं विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली.

सरकारनामा ब्युरो

Aishwarya Rai: दिवंगत सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी इथं आयोजित एका कार्यक्रमात विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिनं विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानंही व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी ऐश्वर्यानं पंतप्रधानांच्या पायांना स्पर्श करत त्यांना अभिवादन केलं. त्याचबरोबर नंतर भाषण करताना तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केलं आणि आपले परखड विचारही मांडले.

व्हिडिओ व्हायरल

या कार्यक्रमातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श करतानाचा ऐश्वर्या रॉयचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे असतानाच तिथं असलेल्या ऐश्वर्या रॉयनं त्यांच्या पायाला स्पर्श करत त्यांना अभिवादन केलं. यावेळी पंतप्रधानांनीही हात जोडून ऐश्वर्याच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. या कृतीनंतर कार्यक्रमस्थळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

मोदींचं केलं कौतुक

दरम्यान, ऐश्वर्या रॉय हिनं यावेळी आपले विचारही मांडले. यावेळी पंतप्रधानांचं कौतुक करताना ती म्हणाली, "तुमची आजच्या कार्यक्रमातील उपस्थिती ही शांतता आणि प्रेरणादायी आहे. तसंच ते स्वामींचा संदेश आपल्याला आठवण करुन देतात की, खरं नेतृत्व म्हणजे सेवा अन् माणसाची सेवा करणं म्हणजेच देवाची सेवा करणं होय. तिच्या या विधानानंतर उपस्थितीतांना टाळ्यांचा कडकडाट केला.

ऐश्वर्यानं मांडले परखड विचार

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच जात-धर्म यावरही तीनं परखड भाष्य केलं. ऐश्वर्या म्हणाली, "इथं फक्त एकच जात आहे ती म्हणजे मानवता. एकच धर्म आहे तो म्हणजे प्रेम आणि एकच भाषा आहे ती म्हणजे हृदयाची भाषा. तसंच इथं फक्त एकच देव आहे तो म्हणजे सर्वव्यापी. साईराम जयहिंद!" ऐश्वर्याच्या भाषणाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनं यावर कमेंट्स केल्या आहेत. ऐश्वर्यानं सर्वांसमोर व्यासपीठावरुन प्रेमाचा संदेश दिल्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT