Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
देश

Ajit Pawar NCP Crisis News : मोठी बातमी | अजित पवार गटाची नवी चाल, खासदारांना अपात्र करण्यासाठी याचिका केली दाखल!

Ajit Pawar Vs Sharad Pawar : अपात्र करण्याच्या याचिकेतून वगळली तीन खासदारांची नावे..

Chetan Zadpe

Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या दोन्ही गटांची पक्ष आणि चिन्हाची लढाई आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पटलावर सुरू आहे. तर आता दुसीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती दोघांकडे एक याचिका दाखल केली आहे.

शरद पवार यांच्या गटातील सदस्यांना अपात्र करा, या मुख्य मागणीसाठी ही याचिका आहे. यात विशेष बाब म्हणजे या याचिकेतून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचे नाव मात्र वगळण्यात आले आहे. (Latest Marathi News)

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कारवाईची मागणी केली तर या दोन ही नेत्यांना लोकांची सहानुभूती मिळू शकते, त्यामुळे या दोन्ही नेत्यांची नावे वगळण्यात आल्याची चर्चा होत आहे. तर खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिल्यानं त्याचं नाव वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार गटाचे समर्थक राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे. तर लोकसभेतील खासदार श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांचेही सदस्यत्व रद्द करण्याची मागणी याचिकेतून केली आहे. कालच शरद पवार गटाच्या खासदारांनी राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांची भेट घेत खासदार प्रफुल पटेल यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT