NCP News : प्रफुल पटेलांच्या बालेकिल्ल्यात अनिल देशमुखांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा!

Ajit Pawar Vs Sharad Pawar : गोंदियामध्ये शरद पवार गटाकडून भव्य बाईक रॅलीही काढली गेली
NCP Gondia
NCP GondiaSarkarnama
Published on
Updated on

Gondia News : राष्ट्रवादीमध्ये फूट पडून अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. मात्र गोंदिया जिल्हा हा प्रफुल पटेल यांचा गृह जिल्हा असल्याने या ठिकाणी कार्यकर्ते उघडपणे पुढे यायला तयार नव्हते. परंतु आता शरद पवार गटाला या ठिकाणी बळ मिळाल्याचे दिसत आहे.

कारण, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल, त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...त्यावर बोलणे योग्य नाही. -

२०२१ मधील सीबीआय अहवाल माध्यमांमध्ये लिक केल्याप्रकरणी अनिल देशमुख यांची मुलगी पुजा देशमुख आणि सून राहत देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे. आज अनिल देशमुख हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, त्यांना यासंदर्भात विचारले असता अनिल देशमुख यांनी ते प्रकरण विचाराधीन आहे. त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही असे म्हणत अधिक बोलणे टाळले आहे.

83 वर्षाच्या बापाला सोडून कोणी जातं का ? -

एकेकाळी अनिल देशमुख हे प्रफुल पटेल यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते. मात्र आज प्रफुल पटेल यांच्याच बालेकिल्लामध्ये अनिल देशमुख आले असता ते प्रफुल पटेलांवर कोणते टीकास्त्र सोडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या मेळाव्यात अनिल देशमुख यांनी प्रफुल पटेलांवर कुठलीही टीका केली नाही. मात्र पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी प्रफुल पटेल आणि अजित पवार यांना नाव न घेता तुम्ही शरद पवारांना आदरणीय म्हणता तर 83 वर्षाच्या बापाला कोणी सोडून जातं का? असाही सवाल केला.

NCP Gondia
Hasan Mushrif : ...अन् मुश्रीफ म्हणाले, ''विमानातून बॉम्ब टाकून, सगळं बेचिराख करणार''

आज अनिल देशमुख यांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यानिमित्त शक्तीप्रदर्शन करीत प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गटाने आपली ताकद दाखवत बाईक रॅलीही काढली आहे हे विशेष.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com