Ajit Pawar NCP : महायुतीत लोकसभेचा तिढा; नऊ जागांसाठी अजित पवार गट आग्रही, 'या' नावांची चर्चा

Lok Sabha Election 2024 : बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव
Maharashtra Lok Sabha Constituency, Ajit Pawar
Maharashtra Lok Sabha Constituency, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : महायुती आणि महाविकास आघाडीने काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू केलेली आहे. सर्व पक्षांनी राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. त्यानुसार दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच राज्यातील नऊ मतदारसंघांबाबत महायुतीतील अजित पवार गटाने आग्रह धरला आहे. यामुळे महायुतीत जागावाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणी करण्याची वरिष्ठांनी सूचना केल्याची माहिती आहे. सध्या राष्ट्रवादीच्या असलेल्या चार जागांसह आणखी पाच जागांची अजित पवार गटाने दावा ठोकला आहे. त्यामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेना अस्वस्थ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Latest Political News)

Maharashtra Lok Sabha Constituency, Ajit Pawar
Suresh Kute News : 32000 कोटींचा समूह; पण सुरेश कुटेंचा आयुष्यात एकदाच विमान प्रवास! कारण काय ?

अजित पवार गटाने बारामती, सातारा, रायगड, शिरूर या आपल्या हक्कांच्या जागांसह धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा-गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगर या जागांसाठी आग्रह धरला आहे. या ठिकाणाहून लोकसभेसाठी निवडणूक लढवणाऱ्या संभाव्य उमेदवारांच्या नावांचीही चर्चा सुरू झाली आहे. बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव घेतले जात आहे.

Maharashtra Lok Sabha Constituency, Ajit Pawar
Rohit Pawar : रोहित पवारांनी डागली तोफ... विकासकामांच्या धडाक्यामुळे राम शिंदे बिथरले !

'हे' आहेत संभाव्य उमेदवार

१. बारामती - सुनेत्रा पवार

२. सातारा - रामराजे नाईक निंबाळकर

३. रायगड - सुनील तटकरे

४. शिरूर - माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (सध्या शिंदे गटात)

५. दक्षिण मुंबई - काँग्रेसमधील बडा चेहरा

६. परभणी - राजेश विटेकर

७. भंडारा गोंदिया - प्रफुल्ल पटेल

८. धाराशिव - भाजपचा मोठा चेहरा

९. छत्रपती संभाजीनगर - सतीश चव्हाण

(Edited by Sunil Dhumal)

Maharashtra Lok Sabha Constituency, Ajit Pawar
Shevgaon-Pathardi : दिवाळीच्या शुभेच्छा की मतदारांच्या भेटीगाठी; राजळे, ढाकणेंची मत पेरणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com