थोडक्यात बातमी:
समाजवादी पार्टीच्या आमदार पूजा पाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गुन्हेगारांविरोधातील धाडसी कारवाईचं सार्वजनिक कौतुक केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी झाली.
पूजा पाल यांच्या पतीचा खून 2005 मध्ये अतिक अहमद आणि त्याच्या भावावर आरोप होता; 2023 मध्ये या दोघांची न्यायालयीन कोठडीत हत्या झाली.
पूजा पाल यांनी विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री योगी यांना “भाऊ” संबोधून त्यांचे आभार मानले आणि भाजपला मदत केल्याच्या चर्चाही आहेत.
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या कार्यकाळात आजपर्यंत अनेक धडाकेबाज निर्णय घेत राज्यातील गुन्हेगारांचं धाबं दणाणून सोडलं आहे. यात 15 एप्रिल 2023रोजी प्रयागराजमध्ये फुलपूरचे माजी खासदार अतिक अहमद आणि त्यांचे भाऊ आणि माजी आमदार अशरफ यांची न्यायालयीन कोठडीत असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याच एन्काऊंटरमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं (Yogi Adityanath) कौतुक करणं समाजवादी पार्टीच्या महिला नेत्याला महागात पडलं आहे.
फुलपूर मतदारसंघात मोठी दहशत असलेल्या अतिक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. समाजवादी पार्टीनं या हत्येवरुन योगी आदित्यनाथ सरकारवर गंभीर आरोप केले होते. पण आता याच हत्येवरुन योगी सरकारचं कौतुक करणाऱ्या अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या समाजवादी पक्षानं महिला आमदाराची थेट पक्षानं हकालपट्टीची कारवाई केली आहे.
समाजवादी पार्टीच्या आमदार पूजा पाल यांनी अलिकडेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धाडसी निर्णयांचं कौतुक केले होते. उत्तर प्रदेश विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात व्हिजन-2047 वरील सतत 24 तासांच्या चर्चेत भाग घेताना आमदार पूजा पाल यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी आमदार पूजा पाल यांनी त्यांच्या पतीचा खून करणाऱ्या अतिक अहमद याला मुख्यमंत्र्यांनी यमसदनी धाडल्याचं त्यांनी म्हटलं.
याचवरुन अखिलेश यादव यांच्या पक्षाने आमदार पूजा पाल यांना समाजवादी पार्टीनं बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कौशांबीच्या चैल मतदारसंघातून आमदार पूजा पाल यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
समाजपार्टी पक्षानं पूजा पाल यांच्यावर कारवाई करताना वारंवार इशारा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करत पक्षविरोधी भूमिका घेत असल्याचा ठपका ठेवला आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याचं कारण पुढे करत समाजवादी पक्षाच्या सर्वच जबाबदारी आणि हकालपट्टी करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत.
आमदार पूजा पाल म्हणाल्या, माझ्या पतीचा खुनी अतिक अहमद याला मुख्यमंत्र्यांनी दफन केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे लपलेले अश्रू पाहिले, जे वर्षानुवर्षे कोणीही पाहिले नव्हते. 15 एप्रिल 2023 रोजी प्रयागराजमध्ये फुलपूरचे माजी खासदार अतिक अहमद आणि त्यांचे भाऊ आणि माजी आमदार अशरफ यांची न्यायालयीन कोठडीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 2005 मध्ये पूजा पाल यांचे आमदार पती राजू पाल यांची हत्या केल्याचा आरोप दोघांवर होता.
राजू पाल 2005 मध्ये बहुजन समाज पक्षाकडून प्रयागराज सिटी वेस्ट येथून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्या हत्येनंतर पूजा पाल 2007 मध्ये बहुजन समाज पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आल्या आणि 2022 मध्ये समाजवादी पक्षाने त्यांना कौशाम्बी जिल्ह्यातील चैल येथून तिकीट दिले होते.
पण 2023 मध्ये अतिक आणि त्याच्या भावाच्या हत्येनंतर पूजा पाल यांचा भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारकडे, विशेषतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे कल वाढला. विशेष म्हणजे पाल यांनी मुख्यमंत्री योगी यांचे थेट भाऊ म्हणून वर्णन केला असून राज्यसभा निवडणुकीतही त्यांनी थेट पक्षविरोधी भूमिका घेत भाजपला मदत केली होती. तसेच गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांनी भाजपला मदत केल्याची जोरदार चर्चा आहे
उत्तर प्रदेश विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेदरम्यान पूजा पाल म्हणाल्या, "माझ्या पतीची हत्या कशी झाली आणि कोणी केली हे सर्वांना माहिती आहे. पण मी आता मुख्यमंत्र्यांचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी माझे ऐकले, जे कोणीही ऐकले नव्हते असंही पाल यांनी म्हटलं.
सपा आमदार पूजा पाल यांनी सांगितलं की, संपूर्ण राज्य मुख्यमंत्र्यांकडे आत्मविश्वासाने पाहत आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली प्रयागराजमध्ये अनेक शोकग्रस्त कुटुंबे आहेत, ज्यांना न्याय मिळाला आहे. असंख्य महिलांनी त्यांचे पती गमावले आहेत, असंख्य मातांनी त्यांचे पुत्र गमावल्याचंही यावेळी बोलून दाखवलं. पूजा पाल यांनी यावेळी अतिक अहमदसारख्या गुन्हेगारांना आणि माफियांना संपवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
1. पूजा पाल यांना समाजवादी पार्टीतून का काढण्यात आलं?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कौतुकामुळे आणि पक्षविरोधी भूमिकेमुळे.
2. पूजा पाल यांच्या पतीची हत्या कोणी केल्याचा आरोप आहे?
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्यावर.
3. अतिक अहमद आणि अशरफ यांची हत्या कधी झाली?
15 एप्रिल 2023 रोजी प्रयागराजमध्ये न्यायालयीन कोठडीत.
4. पूजा पाल यांनी मुख्यमंत्री योगी यांच्याबद्दल काय म्हटलं?
त्यांनी त्यांना “भाऊ” संबोधून गुन्हेगारांवर कारवाईसाठी आभार मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.