Nagpur Congress Protest: ‘मतदान चोर, खुर्ची सोड'; काँग्रेसच्या निशाण्यावर सत्ताधारी अन् निवडणूक आयोग

Election Commission Voter List Errors News update: राहुल गांधी यांनी 'मत चोरी' होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी त्यासंदर्भात पुरावे दिले. त्यानंतर सोशल मीडियावर देशात 2024 चे लोकसभा निवडणूक घेणारे निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे देश सोडून पळून गेल्याची चर्चा आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

 सारांश

  1. राहुल गांधींनी भाजप व महायुतीवर विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी केल्याचा आरोप केला असून, निवडणूक आयोगालाही जबाबदार धरले आहे.

  2. काँग्रेस या मुद्द्यावर "मतदान चोर, खुर्ची सोड" आंदोलन व कँडल मार्चद्वारे महापालिका निवडणुकीसाठी वातावरण निर्माण करत आहे.

  3. काँग्रेसने मतदार याद्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले असून, यादी गायब झाल्याचा आरोप करून आयोगाविरोधात संशय व्यक्त केला आहे.

Nagpur News: काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभा चोरल्याचा आरोप भाजप व महायुतीवर केला होता. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला टार्गेट केले आहे. मतांची चोरी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. आता हाच मुद्दा घेऊन काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. याची झलक शुक्रवारी शहर काँग्रेस कमेटीच्यावतीने सादर केली जाणार आहे. काँग्रेसच्यावतीने ‘मतदान चोर, खुर्ची सोड' आंदोलन करून कँडल मार्च काढण्यात येणार आहे.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कँडल मार्च काढून महापालिका निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती केली जाणार आहे. सध्या मत चोरीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच फड रंगला आहे. प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही प्रामुख्याने मतचोरीवर चर्चा झाली आहे.

तत्पूर्वी काँग्रेसने मतदान याद्यांच्या पडताळणीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन केली आहे. राहूल गांधी यांनी आपल्या लेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदार संघात बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणारे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे यांनी फडणवीस यांच्या विजयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Rahul Gandhi
Jalgaon News: गिरीश महाजन यांच्या गावात मॉब लिंचिंग! मैत्रिणीसोबत कॅफेत बसलेल्या तरुणाला मारहाण, मृतदेह घरासमोर फेकला

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नव्या मतदारांची नोंद करण्यात आली आहे. ऑन लाइन पद्धतीने केलेल्या मतदार नोंदीचा डेटा मागणी केल्यानंतरही उपलब्ध करून दिला जात नसल्याचे गुडधे यांचे म्हणणे आहे. कामठी विधानसभा मतदारसंघात शेजारच्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील कामगारांना मतदार करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून कुठलाही स्थानिक रहिवासी पुरावा घेण्यात आला नसल्याचा आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी केला आहे.

काँग्रेसने सर्व स्थानिक नेत्यांना मतदार याद्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून मतदार याद्या गायब करण्यात आला असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांचा आहे. पूर्वी मतदार यादी डाऊन लोड करता येत होती. त्याचे प्रिंटही काढता येत होते. ही सुविधाही काढून घेण्यात आली असल्‍याने निवडणूक आयोगावर संशय आणखी वाढला आहे. कँडल मार्चच्या माध्यमातून हे सर्व मुद्दे घेऊन काँग्रेस कमिटी जनतेसमोर जाणार आहे.

FAQs

प्रश्न 1: राहुल गांधींनी कोणावर मत चोरीचा आरोप केला आहे?
उत्तर: राहुल गांधींनी भाजप, महायुती व निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला आहे.

प्रश्न 2: काँग्रेस कोणते आंदोलन करत आहे?
उत्तर: काँग्रेस "मतदान चोर, खुर्ची सोड" आंदोलन आणि कँडल मार्च आयोजित करत आहे.

प्रश्न 3: मतदार याद्यांबाबत काँग्रेसची तक्रार काय आहे?
उत्तर: मतदार याद्या वेबसाइटवरून गायब करण्यात आल्या असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

प्रश्न 4: काँग्रेसने तपासणीसाठी कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com