Nitish Kumar and Akhilesh Yadav  Sarkarnama
देश

Bihar Politics: '…तर ते पंतप्रधान झाले असते!' ; 'सपा'च्या अखिलेश यादवांनी नितीश कुमारांना डिवचलं

Ganesh Thombare

Bihar News: बिहारच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडून ते पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करत पुन्हा तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बिहारचं राजकारण चांगलंच तापलं आहे. (CM Nitish Kumar and Akhilesh Yadav )

बिहारमधील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अखिलेश यादव म्हणाले की, 'इंडिया' आघाडीत पंतप्रधान पदासाठी कोणाचा देखील विचार केला जाऊ शकतो. नितीश कुमार हे देखील पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकले असते, असं अखिलेश यादव म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची 'इंडिया' आघाडीत महत्त्वाची भूमिका होती. मात्र, मागील काही दिवसांपासून नितीश कुमार हे 'इंडिया' आघाडीमध्ये जास्त सक्रिय दिसले नाहीत. तसेच ते नाराज असल्याच्या चर्चाही सुरु होत्या. यातच आता नितीश कुमार हे भाजपसोबत जाणार असल्याचं जवळपास फायनल झालं असल्याचं बोललं जात आहे. नितीश कुमार यांनी जर भाजपशी हातमिळवणी केली तर 'इंडिया' आघाडीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

नितीश कुमारांनी याआधी केली होती भाजपशी युती

मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुन्हा एकदा भाजपबरोबर जाणार असल्याच्या चर्चा आहेत. तर 2017 मध्ये नितीश कुमार हे भाजपसोबत गेले होते. तसेच 2022 मध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा लालू प्रसाद यादव यांच्या 'आरजेडी'शी हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं होतं. आता पुन्हा एकदा नितीश कुमार भाजपबरोबर जाण्यासंदर्भात मोठ्या घडामोडी सुरु आहेत.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT