I.N.D.I.A Alliance : दोन मुख्यमंत्र्यांनी सोडली इंडिया आघाडी, 'ते' दोघे राहतील काय ?

Nitish Kumar : नितीश कुमार आणि एम.के.स्टॅलिन यांच्या भूमिकेकडे लक्ष.
Nitish Kumar, Bhagwant Mann, Mamta Banerjee and MK Stalin
Nitish Kumar, Bhagwant Mann, Mamta Banerjee and MK StalinSarkarnama
Published on
Updated on

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चालो रे’ चा नारा देत इंडिया आघाडीत बिघाडी केली. त्यानंतर काही तासांत पंजाबचे ‘आप’चे मुख्यमंत्री भगवान मान यांनी इंडिया आघाडीला ‘परके’ केले. या दोन राज्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हे इंडिया आघाडीत कायम राहतील की नाही आणि त्याच बरोबर बिहारचे मुख्यमंत्री संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार हे कायम राहतील की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणामुळे आणि मिचाँग चक्रीवादळानंतर मदत न दिल्याने स्टॅलिन हे इंडिया आघाडीत कायम राहण्याची दाट शक्यता आहे. तशीच शक्यता जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री यांनी पाटणा येथे भाजपवर केलेल्या टीकेनंतर तेदेखील इंडिया आघाडीत राहण्याची शक्यता अधिक आहे. भाजपच्या सनातनी प्रवृत्तीमुळे स्टॅलिन यांच्या डिएमके अर्थात द्रविड मुन्नेत्र कळघम यांचा मुळातच विरोध आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात आणि इंडिया आघाडीत डिएमके अर्थात एम.के. स्टॅलिन कायम राहतील, अशी आशा आहे.

Nitish Kumar, Bhagwant Mann, Mamta Banerjee and MK Stalin
India Alliance : काही तासांतच ‘इंडिया’ला दुसरा मोठा धक्का; ममतांनंतर आणखी एका मुख्यमंत्र्यांची घोषणा

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले एम.के. स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी मारन यांनी मध्यंतरी सनातन धर्म नष्ट करण्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यावर इंडिया आघाडीतील शिवसेनेने जोरदार प्रहार करत ‘गर्व से कहो हम हिंदू है’ चा नारा दिला होता. तामिलनाडूमध्ये डिएमकेच्या ताब्यात ३९ पैकी ३८ लोकसभेच्या जागा आहेत. येथे काँग्रेस औषधालादेखील सापडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे डिएमकेचा काँग्रेस सोबत येथे कुठलाही वाद स्थानिक पातळीवर नाही. अशा परिस्थितीत स्टॅलिन म्हणतील ती पूर्व दिशा राहणार असल्याने डिएमके वेगळा विचार करणार नाही.

डिएमकेचा भाजपला वैचारिक आणि राजकीय विरोध आहे. त्याचादेखील फायदा इंडिया आघाडीला होईल. त्यामुळे तूर्तास तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हे इंडिया आघाडीचा घटक म्हणून कायम राहतील. पण, इतर मुख्यमंत्र्यांप्रमाणे ते इंडिया आघाडीला सोडण्याची तूर्तास तरी शक्यता नाही. देशातील मोदी सरकार हे भाषिक राज्यावर अन्याय करतात. असा आरोप डिएमकेचा आहे.

गेल्या काळात आलेल्या चक्रीवादळानंतर म्हणावी तशी मदत केंद्र सरकारने राज्य सरकारला दिली नाही. याचा राग डिएमकेमध्ये आहेच. इतकेच नाही तर डिएमकेचा केंद्रातील मोदी सरकारच्या ‘वन नेशन वन इलेक्शनला’ देखील विरोध आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिर उद्घाटन प्रसंगी तामिळनाडूत बंदी, अशी हूल भाजपने उडवली होती. त्यावर मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी भाजपच्या व्हॉट्स ॲप विद्यापीठावर जोरदार टिका केली होती.

इंडिया आघाडीतील पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि आपचे पंजाबचे मुख्यमंत्री यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठीत स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचा भाजपसोबत वैचारिक विरोध आहे. त्यामुळे ते इंडिया आघाडीत राहतील. इतकेच नाही तर तामिलनाडूमध्ये त्यांचा एकछत्री अमल असल्याने तिथे काँग्रेस लोकसभा जागांसाठी ताणून धरणार नाही. त्यामुळे स्टॅलिन हे इंडिया आघाडीत राहतील. इंडिया आघाडीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे कायम राहतील अशी शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिहारच्या जागा वाटपात तूर्तास वाद नसला तरी नितीश कुमार यांना कुठलेही मोठे पद इंडिया आघाडीत दिले गेले नाही. त्यात मोदी सरकारने बिहारचे नेते जननायक कर्पूरी ठाकूर यांना दिलेला सर्वोच्च सन्मान पाहता नितीश कुमार हे इंडिया आघाडीत जाण्याची शक्यता धूसर आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात नितीश कुमार यांनी बुधवारी अत्यंत मागास वर्ग आणि ओबीसीचे आरक्षण या विषयावर जोर देत भाजपला टार्गेट केले आहे. तर नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जातीय जनगणना करत केंद्रातील भाजप सरकारला तसेच कोडींत पकडले आहे. अशा वेळी नितीश हे भाजपसोबत जाण्याची राजकीय शक्यता कमीच आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com