Vinod Tawde in Bihar : विनोद तावडे बिहारची मोहीम फत्ते करणार; दोन दिवस बैठकांचा धडाका

Bihar Politics : बिहारमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे शनिवारी राज्यात दाखल होणार आहेत.
Vinod Tawde, Nitish Kumar
Vinod Tawde, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Bihar News : बिहारमधील राजकारण सध्या तापलं असून मुख्यमंत्री नितीश कुमार दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडून ते पुन्हा भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत येऊ शकतात. त्यांच्यासोबत भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असतील, अशीही चर्चा आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बिहारचे प्रभारी विनोद तावडे शनिवारी (ता. 27) बिहारमध्ये जाणार आहेत. (Vinod Tawde in Bihar)

विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर भाजपने सप्टेंबर 2022 मध्ये बिहार प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याच वर्षी नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी एनडीएतून बाहेर पडत आरजेडीसोबत आघाडी केली. त्या पुन्हा नितीश कुमार भाजपसोबत (BJP) जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नितीश कुमारांनी धोका दिल्याची टीका करत भाजप नेत्यांकडून सातत्याने त्यांना टार्गेट केले जात होते.

Vinod Tawde, Nitish Kumar
Bihar Politics : भाजपचा ‘कर्पूरी’ इफेक्ट बिहारमध्ये सत्तांतराचे संकेत

आता पुन्हा एकदा त्यांच्यासाठी भाजपने दारे खुली केली आहेत. त्यामुळे नितीन कुमार आणि भाजपमध्ये कोणत्या मुद्यांवर समझोता होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. यापार्श्वभूमीवर विनोद तावडे शनिवारी बिहारला जाणार आहेत. शनिवार व रविवारी बिहारमध्ये (Bihar) राज्य कार्यकारिणीच्या बैठका होणार असल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. या बैठकांमध्ये नितीश कुमारांशी आगाडीबाबत शिक्कामोर्तब होऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विनोद तावडे यांच्यावर महत्वाची जबाबदारी राहणार आहे. गुरुवारीही तावडे यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी, माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे शनिवारी तावडे अमित शहांसोबत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू शकतात.

दरम्यान, भाजप आणि जेडीयू यांची आघाडी जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. नितीश कुमारांच्या नव्य सरकारचा रविवारी (ता. 28) शपधविधी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत अद्याप जेडीयूमधील नेत्यांकडून मात्र मौन बाळगण्यात आले आहे. बिहारमध्ये आमदार, प्रमुख नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरूच आहे.   

Vinod Tawde, Nitish Kumar
Lalu Prasad Yadav News : लालूंची मोठी खेळी; भाजपसोबतच्या नेत्यालाच दिली उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com