Akhilesh Yadav Sarkarnama
देश

NDA Vs INDIA : ED, CBI ची गरजच काय? अखिलेश यादवांचा 'असा' आहे प्रस्ताव

Akhilesh Yadav : ईडी आणि सीबीआय या यंत्रणाच्या वापर फक्त विरोधकांची कोंडी करण्यासाठी होतो. देशातील अनेक राज्य सरकार पाडण्यासाठी या यंत्रणांचा गैरवापर सरकारकडून केला जातो.

Sunil Balasaheb Dhumal

INDIA Political News : गेल्या काही वर्षांपासून अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआयच्या माध्यमातून भाजपविरोधी पक्षांतील नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप देशभर होत आहे. या संस्था बंद करायला हव्यात. त्यांच्याऐवजी आयटी आणि एसीबी या संस्थांच्या माध्यमातून चौकशी केली जाऊ शकते, असे मत इंडिया आघाडीतील समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी व्यक्त केले आहे. हा माझा प्रस्ताव असून तो इंडिया आघाडीसमोर ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अखिलेश यादवांनी Akhilesh Yadav केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असून त्या संस्थाच बंद करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. ईडी आणि सीबीआय या यंत्रणाच्या वापर फक्त विरोधकांची कोंडी करण्यासाठी होतो. देशातील अनेक राज्य सरकार पाडण्यासाठी या यंत्रणांचा गैरवापर सरकारकडून केला जातो. दरम्यान, केलेल्या नोटबंदीत नेमका काय घोटाळा झाला, याकडे मात्र या यंत्रणा दुर्लक्ष करतात. हे प्रकर दुर्दैवी असून इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास या तपास यंत्रणा बंद करण्याबाबत प्रस्तावर ठेवणमार आहे, असेही यादव यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी आहे. काँग्रेसच्या पडत्या काळात समाजवादी पक्षाने नेहमीच साथ दिलेली आहे. आमचे एकच ध्येय आहे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे. ही आघाडी काय कार्यरत ठेवून आम्ही एकत्र लढणार आहोत. आता तरी देशात आमचे सरकार येण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही यादव यांनी यावेळी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवारांनी Sharad Pawar प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली होती. यावर अखिलेश यादव म्हणाले, प्रादेशिक पक्ष काय मजबूत स्थितीत राहतील आणि वेळोवेळी काँग्रेसला ताकद देतील. काँग्रेसची ताकद कमी झाली त्यावेळी हेच पक्ष त्यांना साथ देतात. आमचे एकच ध्येय आहे की भाजपला सत्तेतून पायउतार करणे. नितीशकुमार सोडून गेले त्यावेळी आम्ही तातडीने काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा करून मैत्री मजबूत केली. समाजवादी पार्टी काँग्रेसमध्ये कधीही विलीन होणार नाही, असे अखिलेश यादवांनी ठामपणे सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT