Praful Patel News : होय, भाजपमध्ये जाण्याचा आग्रह धरला; पवारांच्या गौप्यस्फोटानंतर पटेलांचीही कबुली

Sharad Pawar Politics : 2004 ची निवडणूक होण्याआधीच प्रफुल पटेल भाजपमध्ये जाण्याची भाषा करत होते. ते सारखे सांगायचे की या निवडणुकीत आपण टिकणार नाही. वाजपेयींसमोर आपला निभाव लागणार नाही.
Sharad Pawar, Praful Patel
Sharad Pawar, Praful PatelSarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीनिमित्त राज्यातील राजकारण असे काही ढवळून निघाले आहे की अनेक जुन्या घटना पुढे येत आहेत. यातून महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकमेकांची कोंडी करण्याचे प्रयत्नही करताना दिसत आहेत. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवार गट भाजपसोबत गेला आहे. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट करत अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री प्रफुल पटेलांवर निशाणा साधला. त्याला पटेलांनीही उत्तर दिले आहे. Praful Patel News

शरद पवारांनी Sharad Pawar एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल पटेल हे 2004 च्या निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये जाण्यासाठी तगादा लावत होते, असे सांगितले. त्याच पटेलांनीही दुजोरा देत पवारांचे संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. याबाबत पटेलांनी ट्विट करत मी भाजपसोबत जाण्यासाठी पवारांकडे आग्रह धरत असल्याचा खुलासा केला आहे. पवार आणि पटेलांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वार्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

शरद पवार म्हणाले, 2004 ची निवडणूक होण्याआधीच प्रफुल पटेल Praful Patel भाजपमध्ये जाण्याची भाषा करत होते. ते सारखे सांगायचे की या निवडणुकीत आपण टिकणार नाही. वाजपेयींसमोर आपला निभाव लागणार नाही. त्यामुळे आपण भाजपसोबत जाऊ, असे ते तासंतास बसून सांगायचे. त्यावर त्यांना एकदाच सांगितले की तुम्हाला जायचे तर जा, मी काही येणार नाही. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते, असेही पवारांनी सांगितले.

Sharad Pawar, Praful Patel
NCP's CM : ‘उद्धव ठाकरेंनंतर पुढची अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता; पण ते अजितदादा नव्हते, तर...’

पवारांनी केलेल्या गैप्यस्फोटावर प्रफुल पटेलांनीही आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले, हो, मी 2004 पासून भाजपाशी युती करण्याचा आग्रह धरला होता. मात्र मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याने देश आणि जनतेसाठी चांगले काम करू शकलो. त्यातून पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सन्मान वाढवण्याचे सतत प्रयत्न केले, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तत्पुर्वी, पवारांनी 1999 मध्ये कॉंग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. तसेच हे ही तितकेच खरे आहे की, 2004 मध्ये काँग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद नाकारले, याकडे लक्ष वेधत पटेलांनी पवारांप्रति आदर कायम असल्याचे म्हटले.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Praful Patel
Harshvardhan Jadhav News : हर्षवर्धन जाधव निवडणुकीनंतर आईला घेऊन काश्मीर सहलीवर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com