Alok Joshi, former RAW Chief, appointed as Chairman of the National Security Advisory Board, bringing extensive experience to India's security apparatus.  Sarkarnama
देश

Alok Joshi : कोण आहेत आलोक जोशी? ज्यांचं नाव ऐकताच पाकिस्तानला फुटतो घाम!

Alok Joshi Appointed as Chairman of National Security Advisory Board : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता आलोक जोशींवर अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

Mayur Ratnaparkhe

National Security Advisory Board : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार प्रचंड कडक भूमिकेत आहे. त्या दृष्टीन नवी दिल्ली जोरदार हालचालीही सुरू आहेत. या दरम्यान आता मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्चना केली आहे. माजी रॉ प्रमुख अलोक जोशी यांना या मंडळाची जबाबदारी दिली गेली आहे.

जाणून घेऊयात कोण आहेत आलोक जोशी?

आलोक जोशी देशाच्या सुरक्षेशीच्या बाबतीत सखोल माहिती आहे. त्यांना वर्ष २०१२मध्ये रॉ चे सचिव बनवले गेले होते. हरियाणात अनेक जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक राहिल्यानंतर ते प्रतिनियुक्तीवर रॉ मध्ये आले होते.

त्यांनी २०१२ ते २०१४ पर्यंत रॉ चे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. यानंतर २०१५ ते २०१८ पर्यंत एनटीआरओचे चेअरमन म्हणूनही सेवा दिलेली आहे. त्यांनी पाकिस्तान आणि नेपाळमधील अनेक महत्त्वपूर्ण ऑपरेशन्स पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

ते प्रदीर्घकाळ परदेशातही राहिले आहेत. परदेशामधून परतल्यानंतर ते काही काळ हरियाणात पोलीस महानिरीक्षक पदावर राहिले, मात्र त्यानंतर लवकरच ते पुन्हा केंद्रात प्रतिनियुक्तीवर रॉ मध्ये परतले.

याशिवाय या मंडळात सात अन्य सदस्यांचाही समावेश केला गेला आहे. यामध्ये माजी पश्चिमी एअर कमांडर एअर मार्शल पीएम सिन्हा, माजी दक्षिणी सेना कमांडर लेफ्टनंट जनरल एके सिंह आणि रियर अ‍ॅडमिरल मॉन्टी खन्ना तसेच, सैन्य सेवेतून निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंह भारतीय पोलीस सेवेतून निवृत्त झालेले दोन सदस्य आहेत. याशिवाय आयएफएसमधून सेवानिवृत्त झालेले बी. व्यंकटेश वर्मा हे देखील सातवे सदस्य असणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT