India Attack Possibility : ‘’भारत कधीही हल्ला करू शकतो, सैन्य अलर्टवर; खुद्द पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनाच धडकी!

India Could Attack Anytime: Pakistan Defence Minister's Shocking Statement : ''...तेव्हाच पाकिस्तान अणवस्त्राचा वापर करेल'' असंही मोठं विधान पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी केलं आहे.
Pakistan Defense minister Khawaja Asif and India
Pakistan Defense minister Khawaja Asif and IndiaSarkarnama
Published on
Updated on

Pakistan Defense minister Khawaja Asif Statement: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबधांमध्ये टोकाचा तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांमध्येही कधीही युद्ध सुरू होण्याची चिन्ह आहेत. भारताने तर या हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना सोडलं जाणार नाही, असं म्हणत दहशतवाद्यांसोबतच एकप्रकारे पाकिस्तानलाही सूचक इशारा दिलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानला चांगलीच धडकी भरलेली आहे. 

आता खुद्द पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद यांनीच भारत कधीही हल्ला करू शकतो, सैन्याला अर्लटवर ठेवण्यात आलेलं आहे, अशी भीती बोलून दाखवली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्येही एकच खळबळ माजलेली आहे. दुसरीकडे भारताने सीमेवर जोरदार तयारी केलेली दिसून येत आहे.

Pakistan Defense minister Khawaja Asif and India
China Supports Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही चीनला पाकिस्तानचाच पुळका ; 'या' मागणीचे केले समर्थन!

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी म्हटले आहे की, मागील आठवड्यात काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही अणवस्त्रधारी देशांमध्ये तणाव वाढलेला आहे. तसेच, आम्ही आमच्या सैन्याला मजबूत केले आहे, कारण आताच्या परिस्थितीत ते गरजेचं झालेलं आहे. अशा स्थितीत काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळे ते निर्णय घेतले गेले आहेत.असंही त्यांनी सांगितलं.

Pakistan Defense minister Khawaja Asif and India
India-Pakistan Tensions : पहलगाम दहशतवादी हल्ल्याने भारत-पाकिस्तानमध्ये टोकाचा तणाव; एक नव्हे तर आठ करार संकटात!

ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तान पूर्णपणे सतर्क आहे आणि तो आपल्या अणवस्त्राचा वापर तेव्हाच करेल जेव्हा आमच्या अस्तित्वाला थेट धोका असेल. पाकिस्तानने या आधी पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी रशिया आणि चीनला सहभागी करून घेण्याची मागणी केलेली आहे.

Pakistan Defense minister Khawaja Asif and India
India-Pakistan Tensions : बुडत्याचा पाय खोलात! भारताने फास आवळताच भेदरलेल्या पाकिस्तानचा आत्मघातकी निर्णय!

जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेणं सुरू केलं आहे. ज्यामुळे पाकिस्तान प्रचंड धास्तावलेला दिसत आहे. शिवाय, जगभरातूनही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला गेला असून, अनेक प्रमुख देशांनी भारताला पाठिंबा दर्शवलेला आहे. दरम्यान, आता पाकिस्तानच्या मदतीस अपेक्षेप्रमाणे चीन आलेला दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com