अमरावतीला आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी घोषित करण्यासाठी विधेयक लोकसभेत सादर होणार आहे.
हा प्रस्ताव मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत मांडला होता आणि तो मंजूर झाला आहे.
या निर्णयामुळे राज्याच्या प्रशासनात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
New Delhi : अमरावती शहराला आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून घोषित करण्याबाबतचे विधेयक बुधवारी (ता.१) लोकसभेत सादर केले जाणार आहे. अमरावती ही आंध्रची एकमेव राजधानी असेल. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या मार्च महिन्यात विधानसभेत ठेवला होता. हा प्रस्ताव त्यावेळी सर्वसंमतीने मंजूर झाला होता.
राज्याच्या राजधानीच्या दृष्टीने सध्या संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी अधिकृतरित्या अमरावती ही राजधानी म्हणून घोषित केली जाणार आहे. यादृष्टीने आंध्र प्रदेश पुनर्गठन सुधारणा कायद्यात सुधारणा केली जाणार आहे.
अमरावती हीच आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असेल, अशी ओळ सुधारित विधेयकाच्या माध्यमातून कायद्यात जोडली जाईल. अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या मार्च महिन्यात विधानसभेत ठेवला होता. हा प्रस्ताव त्यावेळी सर्वसंमतीने मंजूर झाला होता.
यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. अमरावती हीच आंध्रची एकमेव आणि स्थायी राजधानी असून हे शहर ‘ब्ल्यू ग्रीन सिटी’ च्या स्वरुपात विकसित केले जाईल, असे नायडू यांनी त्यावेळी सांगितले होते.
हैदराबाद संयुक्त राजधानी
तत्कालीन संयुक्त पुरोगामी सरकारच्या (यूपीए) कार्यकाळात आंध्र प्रदेशचे विभाजन करण्यात आले होते. त्यावेळी आंध्र प्रदेश आणि वेगळ्या झालेल्या तेलंगण राज्याची हैदराबाद ही संयुक्त राजधानी दहा वर्षांच्या कालावधीसाठी असेल असे निश्चित करण्यात आले होते.
दहा वर्षानंतर हैदराबाद ही तेलंगणची राजधानी असेल तर आंध्रला राजधानीचे नवे शहर निश्चित करावे लागेल, असे ठरवण्यात आले होते. आंध्रची नवी राजधानी अमरावती असेल, असा कायद्यात कुठेही उल्लेख नव्हता.
1. कोणते विधेयक सादर होणार आहे?
अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्याचे विधेयक सादर होणार आहे.
2. हा प्रस्ताव कोणी मांडला होता?
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रस्ताव मांडला होता.
3. हा प्रस्ताव मंजूर झाला आहे का?
हो, तो विधानसभेत सर्वसंमतीने मंजूर झाला आहे.
4. विधेयक कुठे सादर होणार आहे?
लोकसभेत हे विधेयक सादर केले जाणार आहे.
5. या निर्णयाचा परिणाम काय होईल?
राज्याच्या प्रशासनात आणि विकासात मोठे बदल होऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.