Chandrababu Naidu : भाषा वादावर चंद्राबाबू नायडूंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले ''हिंदी आणि इंग्रजी...''

language controversy : याआधी शुक्रवारी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तामिळनाडूच्या नेत्यांची टीका केली आणि म्हटले की...
Chandrababu Naidu
Chandrababu NaiduSarkarnama
Published on
Updated on

language policy in India : केंद्र आणि तामिळनाडू सरकारमध्ये परिसीमन आणि भाषेवरून वाद निर्माण झाला आहे. याला संपवण्यासाठी आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचेही विधान समोर आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाषेबद्दल द्वेष असू नये. ही टिप्पणी अशावेळी समोर आली आहे, जेव्हा दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये हिंदी भाषेला विरोध दिसत आहे. स्टॅलिन सरकारने तर केंद्रावर भाषा लादण्याचा आरोप केला आहे.

या दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू(Chandrababu Naidu) यांनी म्हटले की, भाषेबद्दल द्वेष असू नये. हिंदी दिल्लीत संवादासाठी खूप महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, हिंदी आणि इंग्रजीचे दोन्ही भाषांचे स्वत:चे महत्त्व आहे. ते म्हणाले की, हिंदी राष्ट्रीयभाषा आहे. तर इंग्रजी एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे.

Chandrababu Naidu
voter limit polling booth : आता कोणत्याही मतदान केंद्रावर नसणार १२०० पेक्षा जास्त मतदार ; निवडणूक आयोगाचा निर्णय!

त्यांनी म्हटले की, भारतीय आता विविध देशांमध्ये पोहोचत आहेत. आपण उपजीविकेसाठी भाषा शिकू शकतो. पण आपण आपल्या मातृभाषेपासून दूर जाऊ शकत नाही. भाषा ही फक्त संवादासाठी असते. आपण लक्षात ठेवले पाहिजे की शक्य तितक्या भाषा शिकणे महत्त्वाचे आहे.

याआधी शुक्रवारी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तामिळनाडूच्या नेत्यांची टीका केली आणि म्हटले की, राज्यात कथितरित्या हिंदी लादण्याचा आरोप करणे चुकीचे आहे. त्यांनी म्हटले की , हे नेते हिंदीचा विरोध करत आहेत. परंतु आर्थिक फायदा मिळवण्यासाठी तमिळ चित्रपटांना हिंदीत डब केले जाते. त्यांनी स्पष्ट केले की ते हिंदाला विरोध करत नाहीत.

Chandrababu Naidu
Modi on Pakistan Relations :''मी शांततेसाठी सर्व प्रयत्न केले, कदाचित एक दिवस...'' ; मोदींचं पाकिस्तानबाबत मोठं विधान!

नवीन शिक्षण धोरणात तीन भाषा ठेवण्यासाठी केद्र आणि तामिळनाडू(Tamil Nadu) सरकार आमने-सामने आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. स्टॅलिन यांनी अशातच अर्थसंकल्पीय कागदपत्रांमध्ये रुपया चिन्हास तामिळ भाषेत बदलले होते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com