Khamenei donald trump sarkarnama
देश

USA Attack Iran : इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची एंट्री, तीन अणुस्थळांवर भीषण हल्ला

USA Iran Nuclear Sites Israel : इराणने अमेरिकेला धमकी देत म्हटले की, 'सुरुवात तुम्ही केली आहे. मात्र, शेवट आम्ही करू. प्रत्येक अमेरिकन जवान आमचं लक्ष्य असेल.

Roshan More

USA-Iran : इराण-इराकच्या वाढत्या तणावात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने थेट इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ले केले. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांवर अमेरिकेने हल्ला केला असून याची माहिती अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः दिली आहे.

आपल्या सोशल मीडियावर माहिती देताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हा हल्ला यशस्वी झाला आहे. सर्व अमेरिकन विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत आणि सुरक्षितपणे घरी परतत आहेत. योद्धांचे अभिनंदन. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या सरकारी वाहिनीवरून इराणने अमेरिकेला धमकी देत म्हटले की, 'सुरुवात तुम्ही केली आहे. मात्र, शेवट आम्ही करू. प्रत्येक अमेरिकन जवान आमचं लक्ष्य असेल.' दरम्यान, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने मोठा निर्णय घेत आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे. खबरदारी म्हणून इस्रायलने आपलं हवाई क्षेत्र बंद केलं आहे.

अमेरिकन जहाजांवर हल्ल्याची शक्यता?

यमनमधील इराणसमर्थक हूती बंडखोरांनी इशारा दिला आहे की, जर ट्रम्प प्रशासन इस्रायलच्या सैनिकी मोहिमेत सहभागी झाले, तर ते लाल समुद्रातील अमेरिकन जहाजांवर पुन्हा हल्ले सुरू करतील. मे महिन्यात अमेरिकेबरोबर झालेल्या करारानंतर हूतींनी हे हल्ले थांबवले होते.

400 हून अधिक इराणी नागरिक मृत्युमुखी

इराणच्या आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे की, मागील 9 दिवसांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये 400 हून अधिक इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 3,056 जण जखमी झाले आहेत. त्यांनी सांगितले की, यामधील 2,220 जणांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले, तर 232 जणांना हल्ल्याच्या ठिकाणीच प्राथमिक उपचार देण्यात आले.

इराणचे तीन वरिष्ठ कमांडर ठार केले

13 जून रोजी इस्रायलने इराणमधील अणु व लष्करी ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक वरिष्ठ कमांडर आणि अणु वैज्ञानिक ठार झाले. त्याच्या प्रत्युत्तरात, इराणने रात्रीच्या वेळी इस्रायली प्रदेशावर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्याने जोरदार हल्ले केले. दरम्यान, इस्रायली संरक्षण दल (IDF) ने जाहीर केले की त्यांनी रात्रीच्या कारवाईत इराणचे तीन वरिष्ठ कमांडर ठार केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT