Walmik Karad Health Update : मोठी बातमी! वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, जेलमध्ये डाॅक्टरांचे पथक

Walmiki Karad Jail : वाल्मिक कराड याला तुरुंगात व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी केला होता.
walmik karad
walmik karadsarkarnama
Published on
Updated on

Walmik Karad News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात बीडच्या तुरुंगात असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडली आहे. तुरुंगातच वैद्यकीय पथकाकडून कराडची तपासणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला शूगर आणि कमी रक्तदाबाचा त्रास होतोय. वैद्यकीय पथकाचे लक्ष कराडवर असून त्रास वाढल्यास त्याला अ‍ॅडमीट केले जाऊ शकते.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय म्हणून वाल्मिक कराड ओळखले जातात. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुंडे यांच्यावर मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव होता. मात्र त्यांनी प्रकृतीच्या कारण देत मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा व्हावी म्हणून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे वकीलपत्र उज्वल निकम यांना देण्यात आले आहे.

वाल्मिक कराड याला तुरुंगात व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी केला होता. त्यांनी म्हटले होते की, कराडसाठी बीडच्या तुरुंगात सुखसुविधा उपलब्ध आहे. त्याला झोपण्यासाठी बेड जास्त पांघरून मिळतात. चहासाठी वेगळा कप आहे. तो तुरुंगात असलेल्या इतर कैद्यांच्या नावावर रेशन घेतो. त्याच्यावर खरच कारवाई करायची असेल तर त्याला त्या तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात शिफ्ट करण्यात यावे.

walmik karad
Nilesh Lanke : खासदार निलेश लंके जमिनीवर झोपले, जिल्हा परिषदेच्या शाळेत मुक्काम! नेमकं काय घडलं?

दोन दिवसांनी सुनावणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीड येथील विशेष मकोका न्यायालयात सुनावणी 17 जूनला सुनावणी होणार होती. मात्र, न्यायाधीश रजेवर गेले होते. त्यामुळे सुनावणी झाली नव्हती. त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख 24 जून देण्यात आली . आता दोन दिवसांच्यानंतर मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

मकोकामधून मुक्त करण्याची मागणी

वाल्मिक कराड याने संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपला काही सहभाग नसल्याचे वकिलांच्या मार्फत सांगितले आहे. तसेच मकोकामधून आपली मुक्तता करावी अशी मागणी केली आहे. त्याच्या या मागणीवर सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम व विशेष सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी म्हणणे सादर केले.

walmik karad
IndiGo Flight Mayday Call - आता ‘इंडिगो’च्या विमानातूनही आला धडकी भरवणारा ‘Mayday’ कॉल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com