Amit Shah and Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Amit Shah Uddhav Thackeray news : अमित शाह असतील तर..! ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडावर भाजप खासदाराचं रोखठोक विधान...

Shiv Sena UBT Crisis, Karan Bhushan Singh : उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेने दिल्लीत बोलविलेल्या बैठकीला सहा खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे शिवसेनेत पुन्हा फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

Rajanand More

Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी केल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, या ऑपरेशनशी भाजपचे काहीही देणेघेणे नसल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. दुसरीकडे भाजपच्याच एका खासदाराने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे नाव घेत रोखठोक विधान केले आहे.

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे २० खासदार फुटले आहेत. त्यांनी नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर काही दिवसांतच ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांनीही बंडाचे निशाण फडकावत स्वतंत्र गट करून शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

दोन पक्षांच्या या फुटीवर बोलताना उत्तर प्रदेशातील कैसगंज मतदारसंघाचे भाजपचे खासदार करण भूषण सिंह यांनी मोठे राजकीय विधान केले आहे. ते म्हणाले, टीएमसीचे तर झाले, शिवसेनेचे सुरू आहे. अमित शाह असतील तर काहीही होऊ शकते. नेताजी म्हणाले होते, हनुमानजी. ते तीच भूमिका पार पाडत आहेत.

भाजपने तृणमूल काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण सिंह यांच्या या विधानामुळे दोन्ही पक्षांतील फुटीमागे अमित शाह यांची रणनीती आहे का, या चर्चांना आता उधाण आले आहे. शिवसेनेतील २०२२ च्या फुटीमागे भाजपचीच रणनीती असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधान केले होते.

दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेने दिल्लीत बोलविलेल्या बैठकीला सहा खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे शिवसेनेत पुन्हा फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा खासदारांनी स्वतंत्र गट करून शिंदेच्या शिवसेनेत विलीन होण्याबाबतचे पत्रही लोकसभा अध्यक्षांना दिल्याची चर्चा आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून सहा खासदारांना नोटीस बजावली जाणार असून त्यांच्याकडून बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल खुलासा मागितला जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT