Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सभागृहात भाषण करताना विरोधकांवर जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी देशातील विविध मुद्यांवर भाष्य केलं. तसेच विरोधी पक्षाला देखील घेरण्याचा प्रयत्न केला.
त्याच बरोबर २०१४ च्या आधी देशीत परिस्थिती काय होती? तर २०१४ नंतर केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर काय फरक पडला? याबाबत त्यांनी सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी आपल्या भाषणादरम्यान एक किस्सा सांगितला आहे.
मोदी म्हणाले, ''श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा संकल्प करत मी जम्मू काश्मिरमध्ये गेलो होतो. तेव्हा कोण आपल्या आईचे दूध प्यायला आहे जो लाल चौकात येऊन तिरंगा फडकवतोय, अशा आशयाचे पोस्टर्स दहशतवाद्यांनी लावले होते.
तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये मी भरसभेत सांगितलं होतं, 26 जानेवारीला सकाळी 11 वाजता मी श्रीनगरमधील लाल चौकात पोहोचतोय. सुरक्षा रक्षाकांशिवाय आणि विना बुलेटफ्रुफ जाकेट येतोय, कोण आपल्या आईचे दूध प्यायलं? याचा निर्णय लाल चौकातच होईल, त्यानंतर मी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला'', असं मोदींनी यावेळी सांगितलं.
मोदी पुढे म्हणाले की, ''यानंतर माध्यमांनी मला विचारलं 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला तिरंगा फडकावल्यानंतर तोफांच्या सलामी दिल्या जातात. पण आज मात्र काहीच झालं नाही. त्यावर मी सांगितलं की, लाल चौकात तिरंगा फडकावला तेव्हा पाकिस्तानच्या तोफांनी देखील मला सलामी दिली, गोळ्या चालवल्या गेल्या'', असं मोदी म्हणाले.
पण आज कोणालाही न घाबरता जम्मू काश्मीरला जाता येतं ते फक्त आमच्या सरकारमुळे. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही कार्यरत आहे, असं मोदी संसदेत बोलताना म्हणाले.
दरम्यान, यावेळी मोदींनी राहुल गांधींवर नाव न घेता जोरदार टीका केली. तसेच तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल ये है की फिर भी तुम्हें यक़ीन नहीं, या एका गझलमधील दोन वळी त्यांनी यावेळी सांगितल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.