Balasaheb Thorat News : नाराजी बाजूला ठेऊन थोरात काँग्रेससाठी झटणार; थेट कसब्यात सभा...

Nana Patole News : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्टींना पत्र पाठवले आहे.
Balasaheb Thorat News
Balasaheb Thorat NewsSarkarnama

Kasba by-election : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्टींना पत्र पाठवले आहे. तसेच काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामाही दिली आहे. मात्र, असे असले तरी थोरात कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार करणार आहेत.

त्यासाठी बाळसाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची पुढील आठवड्यात कसबा पेठेत सभा होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी थोरात हे सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नाराजी असली तरी ती पक्षीय पातळीवर आहे. मात्र, उमेदवारासाठी ते मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला संदेश जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे निवडणुकीत तरी काँग्रेस एकसंघ दिसेल.

Balasaheb Thorat News
Balasaheb Thorat News : पटोलेंना आरोपी करणारे थोरात 'या' प्रश्नावर का बोलत नाहीत...

मात्र, नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये रंगलेल्या राजकारणानंतर थोरात काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. थोरात यांनी नाना पटोले यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र, ते पक्षीय पातळीवरचे आहेत. त्यामुळे निवडणुकीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी थोरात यांनी ही भूमिका घेतली असावी, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, बाळासाहे थोरात यांनी स्वत: फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यात त्यांनी सांगितलो होते की मी पक्षाच्या पातळीवर भूमिका मांडणार आहे. त्या प्रमाणे त्यांनी पटोले यांची तक्रार पक्षश्रेष्टींना केली आहे. त्या संदर्भात काँग्रेसची (Congress) मुंबईमध्ये कार्यकारीनीची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये काय होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Balasaheb Thorat News
Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांच्या वरळीतील फसलेल्या सभेला जबाबदार कोण?

काँग्रेस हा आपला विचार आहे, तो पुढे घेऊन जायचा आहे. काही राजकारण झाले असले तरी त्या संदर्भात पक्षीय व्यासपीठावर भूमिका मांडली जाईल. असे थोरात यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांची पुण्यात सभा होणार असल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com