Chandrababu Naidu, Revanth Reddy Sarkarnama
देश

Chandrababu Naidu : मोदींचे मित्र चंद्राबाबू आणि रेवंथ रेड्डींची बंद दाराआड होणार चर्चा? राजकीय चर्चांना उधाण

NDA Telangana CM Revanth Reddy Congress PM Narendra Modi : चंद्राबाबू नायडू यांनी रेवंथ रेड्डींना पत्र लिहिले आहे. त्यांना शनिवारी त्यांच्या घरी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Rajanand More

Andhra Pradesh : एनडीए सरकारमध्ये किंगमेकरची भूमिका बजावणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या दक्षिणेतील राजकारणाने चर्चेला उधाण आले आहे. नायडू यांनी त्यांचे जुने सहकारी व तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना पत्र लिहिले आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आहे.

नायडू यांनी थेट रेड्डींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेण्याची इच्छा पत्रातून व्यक्त केली आहे. त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. आंध्र प्रदेशपासून तेलंगणाच्या विभाजनाला जवळपास दहा वर्षे झाली आहेत. त्यानंतर या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच एकत्र येऊ शकतात.

काय आहे नायडूंच्या पत्रात?

नायडूंनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांना वेगळे होऊन दहा वर्षे झाली आहे. त्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्याचा परिणाम दोन्ही राज्यांतील विकास आणि जनहितावर झाला आहे. या मुद्यांवर चर्चा करून काहीतरी उपाय शोधायला हवेत.

कधी होणार भेट?

नायडू यांनी आपल्या पत्रातून थेट रेड्डींच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येत्या सहा जुलैला म्हणजे शनिवारी दुपारी मी तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या घरी येऊ इच्छितो, असे नायडूंनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या शनिवारी पहिल्यांदाच हे दोन्ही मुख्यमंत्री भेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, नायडूंच्या पत्रावर अद्याप रेड्डी यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मागील दहा वर्षे हैद्राबाद ही दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी होती. आता हैद्राबाद केवळ तेलंगणाची राजधानी असणार आहे. अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी जाहीर करण्यात आले आहे. मात्र, मागील पाच वर्षांत अमरावतीतील कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नायडू यांना पुन्हा एकदा ही योजना सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी शेजारील तेलंगणाची मदत घ्यावी लागू शकते, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT